top of page

मराठा आंदोलक आक्रमक: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या , सरकार अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप

मुंबई/ आहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या अंमलबजाणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदिवसीय रखरखत्या उन्हात कुठल्याही सावलीचा आश्रय न घेता मोकळ्या मैदानामध्ये बाजावर उपोषण केले. मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी करत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. पण सरकार आता मागण्यांवर निर्णय न घेता दिलेल्या अश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा अरोप आंदोलकांनी केला आहे.


मराठा आंदोलकांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात धडक दिली. मंत्री विखे पाटील यांना अश्वासनाबाबत जाब विचात मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. रमेश केरे पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मागण्यांचे निवेदन मंत्री विखे पाटील यांना दिले. त्यामुळे अतापर्यंतचे सरकारचे धन्यवाद आणि आभार मानत असतानाच अचानक असे काय झाले की मराठा आंदोलक आक्रमक झाले? असा प्रश्न निर्माण होत आहे.


सरकार मराठा आंदोलकांच्या मागण्या आणि आश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा अरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे ओबीसींच्या धरतीवर मराठा समाजासाठी 9 निर्यय असो वा इतर सवलती देणे असो यामुळे आंदोलकांचा मोठा विजय झाल्याचे मानले जात असतानाचा आता ठिय्या आंदोलनाने सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.


राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी आज रवाना होणार!. त्यापूर्वीच आंदोलक त्यांच्या बंगल्यात शिरले. आंदोलकांनी गनिमी काव्याने बंगल्यात शिरुन ठिय्या आंदोलन केले. मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सोडण्यासाठी पुढाकार घेतला. पण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार ठोस निर्णय घेत नसल्याचा आणि निर्णयाबाबत चालढकल करत असल्याचा अरोप यावेळी आंदोलकांनी केला. याशिवाय मराठा उपसमितीने दिलेली आश्वासनं वेळेत पाळली जात नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.


जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना सरकारने काही निर्णय घेतले, या जीआर विरोधात आम्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. कारण या जीआरमध्ये, ज्या बांधवांच्या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, हे आतापर्यंत या बैठकीत विखे पाटील यांनी मान्य केले आहे. मग या सरकारने मराठा समाजासाठी केलंय काय? असा सवाल रमेश केरे पाटील यांनी केला. विखे पाटील हे उपोषणावेळी आल्यावर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाज मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत होता. मराठा समाजाला न्याय मिळेल असे त्यांना वाटत होते. पण मराठा आंदोलकांची दिशाभूल होत आहे. अजिबात सरकारने न्याय दिलेला नाही. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असतील, अशाच बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हैदराबाद गॅझेट नुसार, मराठवाड्यातील एकाही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असं स्वत: उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केल्याचे केरे पाटील म्हणाले.


त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आरबी समुद्रात पुतळा अद्याप का उभारण्यात आला नाही याचा जाब विचारण्यासाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चा गिरगाव चौपाटीवर जलसमाधी घेत आंदोलन करणार आहे. दुपारी तीन वाजाता आंदेालन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकत्यार्ंंनी पोलिसांना पोलिसांनी ताब्या घेतलं आहे.

Comments


bottom of page