महाराष्ट्रातील शेतकर्यांना महायुती सरकारचे दुहेरी गिप्ट ; कर्जमाफीनंतर आता थकीत वीजबिलंही माफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Navnath Yewale
- Jul 15
- 1 min read

मुंबई: राज्यातील शेतकर्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकर्यांची तब्बल 48 हजर कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
भाजप प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि.15) सत्कार आयोजीत करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले , “ शेतकर्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोर्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे,
या एका ध्येयाने हा निर्णय घेतला आहे.”
राज्य सरकारने याआधीच शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीजपंपांचे वीजबिल माफ केले आहे. मात्र, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीतील वीजजोडण्यांची जुनी थकीत वीजबिले अद्याप कायम आहेत. ती अजूनही प्रत्येकाच्या खात्यावर थकबाकी म्हणून जमा आहेत. त्यामुळे त्या बिलांची कधीही वसुली होऊ शकते, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यामुळे एखादा शेतकरी पुन्हा वीजजोडणी घेण्यासाठी गेला, तर त्याला ती मिळण्यात अडचणी येतात. त्याच्या नवावर थकबाकी आहे का, याची तपासणी केली जाते. यामुळेच आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की राज्यातील सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी थकीत वीजबिले माफ करणार आहोत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
नव्याने इतिहास लिहिता यावा म्हणूनच आम्ही शेतकर्यांची पाटी कोरी करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यातील 76 टक्के शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात असून, यसा वर्षाअखेर शेतकर्यांना 100 टक्के मोफत दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



Comments