top of page

महाराष्ट्रात संताप: 350 व्हिडिओ, 180 मुली; मुलींच आयुष्य पणाला; 19 वर्षीय तरुणाचं भयंकर कांडमुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर, निषेधार्थ आज परवाडा शहर कडकडीत बंद, चार आरोपी जेरबंद

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. सोशल मीडियावर मैत्री करून विश्वास संपादन करत तरुणींना जाळ्यात ओढण्याचा आणि त्यांचे आयुष्य उध्दवस्त करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


या प्रकरणात सुमारे 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याची माहिती समोर आली असून तब्बल 180 पेि अधिक मुलींचा यात समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्यात अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


या प्रकरणातील मुख्य संशयित 19 वर्षीय मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले की, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यामातून मुलींशी ओळख वाढवत असे. त्यानंतर प्रेमाचे आमिष दाखवत त्यांच्याशी जवळीक निर्माण करून खासगी क्षण गुप्तपणे चित्रित करत असे. हे व्हिडिओ आणि फोटो नंतर सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करून संबंधित मुलींना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक पीडित मुली अल्पवयीन असल्याची शक्यता आहे. काही व्हिडिओंमध्ये मुलींची असाहायता स्पष्ट दिसून येत असल्यामुळे ब्लॅकमेलिंगद्वारे त्यांचे शोषण झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पीडितांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याची भीती व्यक्त होत आहे.


पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आरोपी एकटाच नसून त्याच्या मागे मोठे जाळे असण्याची शक्यता तपासात समोर येत आहे.


दरम्यान, या घटनेनंतरही एकही पीडित अधिकृत तक्रार घेऊन पुढे आलेली नाही. मात्र पोलिसांनी स्वत:हून कारवाई करत तपास सुरू केला आहे. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनिय ठेवली जाईल आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


या घटनेमुळे सोशल मिडियाचा वापर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर, 4 आरोपी जेरबंद : परतवाडा अचलपुर या जुळ्या शहरांसह संपूर्ण राज्य हादरवून सोडणार्‍या अश्लील व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी आता तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणातील मुख्य अरोपी अयान अहमद आणि उजेर खान यांच्यानंतर आता सहाद आणि तबरेज या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 4 झाली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर अचलपूर परतवाडा शहर बुधवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले. व्यापारी व स्थानिक नागरिकांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.


अनेक अल्पवयीन मुलींना प्रेमजाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या मुख्य आरोपी अयान अहमदच्या घरावर बुधवारी (दि.15) नगरपरिषद प्रशासनाने बुलडोझर चालवला. स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने हे अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे गुन्हेगारांध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Comments


bottom of page