मागण्या पूर्ण होईपर्यंत कसलेही उपचार घेणार नाही, शिष्टमंडळावर जरांगेंचे आरोप; मुंबईत आदोलनावर ठाम

जालना : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणा दरम्यान, त्यांची भेट घेतली. खालावलेली प्रकृती पाहता जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तात्काळ कारवाई सुरू करून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी त्यांच्याच हस्ते हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जाईल, असा सरकारच्या वतीने शब्द दिला. त्यामुळे पाटील यांनी लाड यांच्या विनंतीला मान देत पाणी घेतले आणि सलाईन लावून घेण्याची तयारी दर्शवली.
दोन दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा त्यांची भेट घेत सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती देत त्यांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा शनिवार (दि. 5) आठवा दिवस आहे. माघारी गेलेल्या सरकारच्या शिष्ठमंडळाकडून पुन्हा चालढकल सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
तसेच आजपासून पुन्हा पाणी, सलाईन व वैद्यकीय उपचार न घेण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने सरकारचे टेन्शन वाढवणार असून हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदतीत पूर्तता न केल्यामुळे आपण पाणी, सलाईन न घेण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनाही त्यांनी माघारी पाठवले.
काही प्रमुख मागण्या दोन दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राज्यातील महायुती सरकारने जरांगे पाटील यांनी दिले होते. मात्र, दिलेल्या वेळेत सरकारने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्यांची आंमलबजावणी सरकारकडून प्रत्यक्षात होत नाही, तोपर्यंत मी काहीही घेणार नाही आणि उपचारही करून घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकला सांगितले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी न झाल्याने जरांगे यांचे उपोषण सुरूच आहे. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, जरांगेच्या मागण्यांवर एक ते दोन दिवसात निर्णय कळवू अशी भूमिका शिष्टमंडळाने जाहीर केली आहे.



Comments