शिष्ठमंडळाने आंतरवालीत दुत पाठवला, अधिकार्यांशी चर्चा निष्फळ

जालना: मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्यानंतर रात्री उशिरा शिष्ठमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांना पाठवण्यात आलं, मात्र, अधिकार्यांची जरांगे पाटील यांच्याशी चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागण्यांबाबत सकारात्मक बाजू मांडत सरकारने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे (दि.29 ऑगस्ट) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी (दि.1) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली. दरम्यान, सोमवारी (दि.31) सरकारचे शिष्ठमंडळ आंतरवालीत दाखल होण्याचे संकेत होते. मात्र, सरकारच्या शिष्ठमंडळाचा कोणतचा संपर्क झाला नाही, सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत गनिमी काव्याने मुंबईकडे रवाना होण्याचे आवाहन केले. मंगळवारी (दि.1) पहाटे त्यांची प्रकृती खालावली, शुगर लेवल कमी झाल्याने त्यांना उलट्यांचा त्रास झाल्याने आंदोलनस्थळी सरकारच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळपर्यंत सरकारचे शिष्ठमंडळ आंतरवालीत दाखल होण्याची माहिती मिळाली. पण शिष्ठमंडळाने जालनाचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी पाठवले. सरकारच्या शिष्ठमंडळाचा निरोप घेवून आलेल्या अधिकार्यांशी चर्चेचा प्रस्ताव फेटाळत जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही अभ्यास करून प्रशासकीय सेवेत रुजू झाला आहात याचा आम्हाला अभिमान आहे. पण ज्यांना पुस्तकं वाचता येत नाहीत तेच तुम्हाला शिकवत आहेत. यांच्यासाठी मी खंबीर आहे. तुम्ही त्यांची बाजू घेवून नका . तुमचं प्रशासकीय कामकाज तुम्ही करा, सरकारला माझं सांगणं आहे की अधिकार्यांना माझ्याकडे पाठवू नका. मागण्यांचा जीआर घेवून तुम्ही या. दरम्यान अधिकार्यांशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर माजी आमदार शाहजी बापू देशमुख (पाटील) हे आंदोलनस्थळी आले.
शिष्ठमंडळाचा निरोप घेवून आलेल्या अधिकार्या नंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपणे चौकशी करून जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असल्याचे सांगितले. कोणाच्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकचा विचार केला तर आत्ताच सरकारने तोडगा काढण्याची गरज आहे. एक्करावला मराठा आता गुंठ्यावर आला आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाचाही विचार करावा. आम्हाला कोणाच्या ताटातलं उष्ट नकोय, पण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची रास्त मागणी जरांगे पाटलांची आहे याचा अर्थ आमचच आम्हाला द्या.जरांगे पाटील समाजाच्या मागण्यांसाठी लढत असताना कोणी त्याच्या विरोधात लढणं योग्य नसल्याचंही माजी आमदार शाहजी बापू पाटील म्हणाले.
मी माझ्या परिने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. आंदोलनामध्ये मी सहभागी राहीलो आणि राहणार आहे. पाटलांची प्रकृती लक्षात घेता सरकारने सकाळपर्यंत तोडगा काढवा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



Comments