top of page

सरकारच्या अश्वासना नंतर सोनम वांगचुक यांचे 26 व्या दिवशी उपोषण सोडले

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या हास्ते ज्यूस घेतलं; तीन मागण्या मान्य

नवी दिल्ली : सोनम वांगचुक यांनी अखेर मागे घेतले. नीट पपेरफुटीप्रकरणी जाबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यांसह इतर मागण्यांसाठी ते मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी ज्यूस घेवून उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.


सोनम वांगचुक उपोषण सोडत असताना त्यांच्या पत्नी गीतांजली या देखील उपस्थित होत्या. यावेळी जीपी नड्डा यांनी वांगचुक यांना एक पत्र वाचून दाखवले. सरकारकडून वांगचुक यांना अश्वासन देण्यात आली आहेत. संसदेवरील मार्चा आणि जंतरमंतरवरील शांततापूर्ण मोर्चात सहभागी झालेल्या एकाही आंदोलकावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. संसदेत पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी उपायोजना करण्याच्या मुद्दयावर चर्चा होईल, असे अश्वासन त्यांनी दिले. तसेच नीट पेपर लीकनंतर आत्महत्या करणार्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचेही अश्वासन देण्यात आले. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी हॉस्पीटलमध्ये जेपी नड्डा यांच्या हस्ते ज्यूस घेवून उपोषण सोडले.

Comments


bottom of page