सायंकाळपर्यंत बारामतीत 59.27 टक्के, राहुरीत 56.72 टक्के मतदान
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

बारामती/राहुरी: पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीची पोट निवडणुक लागली, तर राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या दुखद निधनाने राहुरीमध्ये निवडणुक होत आहे. आयोगाने अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत बारामतीमध्ये 59 टक्के तर राहुरीमध्ये 56.72 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. तर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे झालेल्या जागेेवर अक्षय कर्डीले नशीब अजमावत आहेत.
दरम्यान, बारामती विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत 59.27 टक्के मतदान झाले. बारामतीमध्ये 384578 इतके मतदार आहेत, त्यापैकी 202808 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राहुरीमध्ये सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत 56.72 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बूथ क्रमांक 233 काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. शिवाय जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला.



Comments