15 ऑगस्टपासून सुरू होणार ‘ कॉक्रोच जनता पार्टी’ ची देशव्यापी मोहिम
- Navnath Yewale
- Aug 11
- 2 min read

नवी दिल्ली : गावांतील सरकारी शाळांची दयनिय अवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजीपी) एका मोठ्या मोहिमेची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यसासाठी 15 ऑगस्टपासून देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे.
पालकांना शाळांचे सामाजिक परीक्षण करण्यसाचे आवाहन केले जाईल आणि सरपंचांना त्यांच्या गावातील सरकारी शाळा सुधारण्याचे आवाहन केले जाईल. दिपके म्हणाले की, ते महाराष्ट्रातील त्यांच्या हिंगोली या गावातून या मोहिमेचा शुभारंभ करतील. सीजेपीने या उपक्रमाला ‘ सरपंच चॅलेज’ असे नाव दिले आहे.
देशव्यापी मोहिम 15 ऑगस्टपासून सुरू होईल. अभिजीत दिपके यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये ते म्हणात की, 15 ऑगस्ट रोजी आपला देश 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. गेल्या 80 वर्षात गावातील सरकारी शाळांकडे सर्वाधिक दुर्लक्ष झाले आहे. देशात नविन संसद भवन आणि नविन पंतप्रधान निवासस्थान बांधले जाऊ शकते, तर गावांमध्ये नवीन आणि चांगल्या शाळा का बांधल्या जाऊ शकत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी आणि मजुरांच्या मुलांनाही देशाचे भविष्य म्हणून पाहिले पाहिजे.
आजही अनेक गावांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. सरकारी शाळांमध्ये पिण्याचे पाणी, वीज आणि शौचालये यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ते म्हणाले की सरकारी शाळांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू झाली पाहिजे. दिपके म्हणाले की, ते महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील गावांना वैयक्तिकरित्या भेट देऊन सरपंचांची भेट घेतली आणि सरकारी शाळा सुधारण्यासाठी पुढाकर घेण्याची विनंती करतील.
ऑडिट फॉर्म लवकरच प्रसिद्ध: या मोहिमेचा एक भाग म्हणून छापील ऑडिट फॉर्म प्रसिद्ध केला जाईल. या फॉर्ममुळे पालक आणि इतर नागरिकांना सरकारी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या आणि नसलेल्या मुलभूत सुविधांची माहिती भरता येईल. पक्ष हा फॉर्म आपल्या अधिकृत इंटनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर मोहिमेच्या व्हिडिओ लिंकसह शेअर करेल. सीजेपी म्हणतात की, या उपक्रमाचा उद्देश केवळ सरकारी शाळांमधील उणिवांवर प्रकाश टाकणे हाच नाही, तर शाळांची स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक आणि सरंपचांन संघटित करणे हा देखील आहे.



Comments