top of page

150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या खरातची एचआयव्ही तपासणी

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्याला आलं आहे. एसआयटी अणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. यादरम्यान, पोलीस कोठडीची हवा खाणार्‍या अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवरप अत्याचार केल्याचं पोलिस तपासात उघडकीस आले आहे. नाशिक पोलिसांत दाखल झालेल्या 8 गुन्ह्या पैकी 7 गुन्हे महिला आत्याचार संदर्भात आहेत. गुन्हा दाखल केलेल्या महिलांव्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिढीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्ह्याशी सबंधीत सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत.


अशोक खरातचा मोबाई तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत महत्वाचे पुरावे पथकाला मिळणार असल्याची माहिती आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. एसआयटी कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील एसआयटीने जप्त केला आहे.


दरम्यान, अशोक खरात हा व्हॉट्सअपवर व्हॉईस मॅसेजने संपर्क करत होता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती मिळाली असून मोबाईलमधील काही मॅसेज डिलिट झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशो कखरातचा मोबाईलमधील डेटा एसआयटी पथक, सायबर पोलिस तसेच सायबर एक्सपर्टकडून रिकव्हर केला जात आहे. या तपासात खरात कोणाच्या दैनंदिन संपर्कात होता. अणि व्हाइस टायपिंगमधून काही महत्वाची माहिती समोर येऊ शकते. अशोक खरातचे दैनंदिन संपर्कात कोण होते? त्यांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेकांचे नाव आणि सभाषण एसआयटी पथकाला मिळणार असल्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page