top of page

2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचे 160 आमदार निवडून येणार होते! काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

58 minutes ago
1 min read

राज्यात गेल्या काही दिवसापासून बोगस मतदानाच्या विरोधात मोहिम राबवली जात आहे. महाविकास आघाडीकडून गेल्या काही दिवसापासून मतचोरीच्या विरोधात आंदेालन केले जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण धावू निघाले आहे. दुसरीकडे सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ता निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलक पुकारण्यात आले आहे. त्यातच आता या बोगस मतदानावर थेट बोट ठेवत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.


राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे त्यानंतर होत असलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल असे राज्यभर वातावरण होते. त्यावेळेसचे वातावरण पाहिल्यावस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथे बोलताना केला आहे.


2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 75 आमदारांसह महाविकास आघाडीचे 160 आमदार निवडून येणार असल्याचा महत्वपूर्ण अहवाल सरकारी यंत्रणांनी दिला होता. या संदर्भातील महत्वपूर्ण अहवाल ‘ इंटेलिजन्स ब्युरो’ ने सरकार आणि विरोधी पक्षांना दिला होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेत बोलताना केला आहे.


महागाईचा मोठा भडका उडणार : नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाचनंतर वाढवलेल्या मतदानाच्या बोगस आकडेवारीतून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापासून रोखण्याचा कट शिजला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच पुढच्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असून पेट्रोलचे दर 400 रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज आणि भिती त्यांनी व्यक्ती केली.

Comments


bottom of page