29 ऑगस्टला एकही गाडी घरासमोर ठेवू नका, सरसकट मराठ्यांनी आंतरवालीला या !, सोलापूरातुन जरांगे पाटील कडाडले; सरकारवर हल्लाबोल
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 1 min read

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. शुक्रवारी (दि.7) तुळजापूरात तुळजाभवानीच्या दर्शनानंतर आज (शनिवार, दि.8) ते सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. सोलापूर येथील समाजबांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला.
‘ समज गैरसमज नको, आम्ही इशारा सभा कोठेही लावलेली नाहीय, सोलापूर जिल्ह्यात लावली असती तर रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही फक्त गावखेड्यातल्या लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय, आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये नुकसान सर्वांचं आहे, यामध्ये फक्त गरीब मराठ्यांचे नुकसान नाहीये, तर यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेसमध्ये असलेल्या मराठा बांधवांचं देखील नुकसान आहे. व्हॅलिडिटी रद्दकरण्यात येत आहेत, आणि मी हे समाजाला दाखवून दिलं आहे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले,मी समाजाचं हित बघितलं, स्वत जाळून जाळून 58 लाख नोंदी दिल्या. यांना माहित आहे की जरांगे पाटील फक्त आरक्षण देतोय, मात्र त्यांना आरक्षण द्यायचं नाही. सरकारने आता एक कट रचला आणि गैरसमज पसरवला आहे. नियोजित कट रचला, 4 प्रमाणपत्र रद्द केले, असंही ते यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने फसवणूक केल्याचा अरोप करत सक्षम आंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टपासून आंदोलनाची पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर पाटील म्हणाले की, “ मराठ्यांनो घर सोडायला शिका,29 ऑगस्ट ला घरासमोर एकही गाडी राहू नये, राज्यातील सर्व मराठ्यांनी आंतरवालीत येण्याचं अवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेल्या मराठ्यांनी माझी चूक सांगावी, संजय शिरसाठ यांनी फोन करून कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं, यात मी चुकीचं काय बोललो? घाडके नावाच्या व्यक्तीची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द झाली यात मी चुकीचं काय बोललो? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाळींचं वाटोळं करायला लागलेत म्हणून मी बोलतोय, मी याबाबतचे पत्र सुद्धा सोबत आणले असल्यसाचं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.



Comments