70 वर्षे काँग्रेस ईव्हीएम हॅक केलं, आम्ही ईव्हीएम हॅक केलय तर... -रेखा गुप्ता
- Navnath Yewale
- Sep 21
- 2 min read

लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून मत चोरीच्या मुद्यावरून भाजपवर आरोप केले आहेत. तसेचे ईव्हीएमबाबतही संशय व्यक्त करत निवडणूक आयोगावर देखील सडकून टीका केली आहे. यामळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्त यांनी “ आम्ही ईव्हीएम हॅक केलं तर विरोधकांना (काँग्रेस) वाईट वाटतंय”, असं वक्तव्य केलं आहे. यामुळे राहुल गांधी यांच्याकडून होणारे सततचे आरोप भाजप नेत्याला मान्य आहेत की काय? असा तर्क लावला जात आहे.
काँग्रेस लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या मतदारांवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर आरोप करताना दिसत आहेत. मतचोरीच्या मुद्यावरून आरोप करताना ‘राहुल गांधी’ ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलाता येऊ शकतो, असा आरोप केला होता. तर याच मार्गाने भाजपने मतचोरी करून सत्ता मिळवल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात अशी मागणी ही केली आहे. मात्र हे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत.
अशातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा भाजपच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी, आम्ही ईव्हीएम हॅक केलं, त्यामुळे विरोधकांना वाईट वाटतंय असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधीचे आरोप भाजपला मान्य आहेत असाच अर्थ निघत असल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नुकताच एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीवेळी त्यांनी विरोधक दावा करत आहेत की, ईव्हीएमच्या कृपेने भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (भाजपची विद्यार्थी शाखा) आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत. निवडणूक आयोगही आमच्या बाजूने आहे. मात्र गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेस आणि विरोधक ईव्हीएम हॅक करतच आले होते. त्यावेळी त्यांना काही फरक पडत नव्हता, आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या या विधानानंतर आता आपने देखील आरोप केले असून माजी मुख्यमंत्री तथा आप नेते अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. जो रेखा गुप्ता यांच्या वक्तव्याचा असून “ दिल्ली भाजपच्या नेत्या काय म्हणतायत एकदा बघा” असे म्हटले आहे.
दरम्यान या वक्तव्यावरून समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत असून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे एका युजरने म्हटलं आहे. एका एक्स युजरने, रेखा गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस 70 वर्षापासून ईव्हीएम हॅक करत आलं आहे. मात्र पूर्वी भारतात निवडणुक ईव्हीएमवर होत नव्हत्या.”
भारतात 2004 पासून आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका या ईव्हीएमवर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. 2004 च्या आधी भारतात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या जात होत्या.


Comments