VIDEO/ पाचही पुरुष आमदार विवाहीत,.. मग मिरच्या तुम्हालाच का झोंबल्या; ‘बात निकलेगी, तो दुर तक जाएगी’जयंत पाटील, सुरेश धस वादात महेबुब शेख यांची उडी
- Navnath Yewale
- 3 days ago
- 3 min read

बीड: विधीमडळाच्या अधिवेशनामध्ये काल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी बीडमधील आमदार पत्नीने भेसळयुक्त दुधासाठी कंपनीवर दबाव आणून एका संपादकास बातमी लावल्या प्रकरणी धमकावल्याचे सांगत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना इशारा देत ‘ मी सोपा नाही, मी डिवचण्या जोगा नाही ’ जयंत पाटील यांनी माझ्या नादाला लागू नये पुढच्या अधिवेशनात सगळंच समोर येईल असा इशारा देत जयंत पाटील यांना डिवचले, आमदार जयंत पाटील, सुरेश धस यांच्या वादात आता राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी उडी घेतली आहे. महेबुब शेख यांनी आमदर धसांवर जोरदार पलटवार करत इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील शाब्दीक वाद सुरू असताना राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी बुट्ट्या गायकवाड खून प्रकरण, संस्थान, वक्फबोर्डाच्या जमिनी, तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील 20 हजार कोटींची टेंडर, राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अदिवासींच्या, देवस्थानच्या जमिनींच्या कश ऑर्डर झाल्या या पासून थेट डोक्याच्या वापरापर्यंतचे गंभीर आरोप करत भाजप आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे.
सोशल मीडियावरील आपल्या आकाऊंडवर व्हिडीओद्वारे महेबुब शेख यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाना साधत इशारा दिला. सोमवारी (दि.13) मच्छिंद्रगड येथे माध्यमांसी संवाद साधताना डोक्याला हात लावत ‘ जयंत पाटील तुम्हाला देवाने बुद्धी दिली, त्यापेक्षा निश्चित आम्हाला जास्त दिली आहे’ आमदार धसांच्या या वक्तव्याचा ‘ जिनके किरदार मैले होते है, अक्सर वही लोग दुसरोंके किरदार पर उंगलीया उठाते है’ या शेरोशायरीने समाचार घेत महेबुब शेख म्हणाले.
‘ निश्चितच देवाने सर्वांना बुद्धी दिली, पण बुद्धीचा कसा वापर करायचा तो ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा भाग आहे.’ जयंत पाटलांनी त्यांच्या बुद्धीचा वापर त्यांच्या मतदार संघातील शेतकर्यांच्या हितासाठी कारखाने उभारणीतून केला. विक्रमी तीन ते साडेतीन हजार रुपांचा हप्ता पंधरा दिवसांत शेतकर्यांना मिळतो, तिथे संस्था चांगल्या उभा केल्या. ज्या संस्थेत 300 ते 350 विदेशातील लोक येऊन वाळव्यामध्ये शिक्षण घेत आहेत. हे त्यांच्या बुद्धमत्तेचा वापर कसा करायचा ते त्यांनी ठरवलं. पण तुमच्यासारखे (आमदार सुरेश धस) काही लोक बुद्धीमत्तेचा वापर काय करतात, आपल्या सोबत नऊ नऊ वर्षे जिवावर उद्धार होऊन ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्यांवर खोटे बलात्काराचे (छत्रपतीसंभाजीनगर कथित अत्याचार प्रकरण) गुन्हेदाखल करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी तुम्ही डोक्याचा वापर करता आसा आरोपही त्यांनी केला .
शेख पुढे बोलताना म्हणाले, देवस्थानच्या जमिनी हाडप करण्यासाठी डोक्याचा वापर करता शेवटी डोकं सगळ्यांनाच दिलं आहे. वक्फ बोर्डाच्या आणि देवस्थानच्या जमिनी लाटण्यासाठी जयंत पाटील यांनी कधी डोक्याचा वापर केला नाही, बोलण्या सारखं खूप काही आहे. राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आदिवासी आणि देवस्थानच्या जमिनींच्या ऑर्डर कशा झाल्या म्हणत शेख यांनी आमदार धस यांच्यावर गंभीर आरोप केले. मार्केट व्हॅल्यूच्या किती टक्के पैसे गोळा केले आणि आता नगरपंचायतचा घन-कचराही कसा पुरत नाही या बर्याच गोष्टी आहेत म्हणत शेख यांनी बुट्या गायकवाड खून प्रकरणाकडे बोट दाखवले.
आष्टीतील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणापासून मोठी यादी आहे ‘ बात निकलेगी तो दुर तक जाएगी’ म्हणत जयंत पाटील यांच्या सभागृहातील भाषणाचा दाखला देत शेख म्हणाले, ‘जयंत पाटील काय म्हणाले की दुध भेसळमध्ये एका आमदाराच्या पत्नीने दम दिला.’ बीड जिल्ह्यात सहा आमदार आहेत पैकी एक आमदार महिला उर्वरित पाच आमदार पुरूष आणि सर्व विवाहीत आहेत. कोणीही अविवाहित नाही , मग तुम्हालाच मिरच्या झोंबायचं कारण काय? जीओ टॅगिंचा जीआर ते म्हणता त्याच जीआरवर देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री असताना 20 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले. मग तुम्हाला म्हणायचं का त्यांनीच महाराष्ट्र लुटला. त्यावेळच्या जलसंधारण मंत्र्यांनी त्या जीआरवर आत्तापर्यंत कामं काढली आहेत. त्यामुळे दुध भेसळ ही कोणी केली, त्या आमदाराच्या बायकोचं नाव समोर यायला नको? बुट्ट्या गायकवाडवर हल्ले कसे झाले, त्याचा खून कसा झाला हे समोर यायला नको?. मागील आठ महिन्यापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर आले एका आदिवासी महिलेला स्वत:ची साडी काढून पळायची वेळ का आली होती , तर हे सगळंच पुढच्या अधिवेशनात काढू असा इशाराही शेख यांनी दिला.
डोक्याला हात लावत शेख म्हणाले, तुम्हालाही बोलता येतं, देवाने आम्हाला पण दिलंय आम्हालापंण बोलता येतं. “ आंधळ्याने आरसा विकायचा नसतो, आणि ज्याचं जगनं खोटं आहे, त्याने सत्याचं भजन गायचं नसतं” असा उपरोधक टोलाही महेबुब शेख यांनी लगावला.
कोण काय म्हणाले
आमदार जयंत पाटील म्हणाले होते: विधीमंडळाचे दुध भेसळीच्या मुद्यावर लक्ष वेधत जयंत पाटील म्हणाले, मोठ मोठ्या कंपन्या म्हणत आहेत की, आम्हाला खराब दुध घेण्यासाठी दबाव येतो. एका चॅनलने बातमी लावली की त्याच्या संपादकाला आमदाराच्या पत्नीचा फोन, धमकी दिली याची ही चौकशी झाली पाहिजे, तुमच्यावरील अन्याय दुर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी करून कोणाची बायको आहे ते पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या सभागृहात द्यावी.
आमदार सुरेश धस म्हणाले: जयंत पाटील यांना सवय आहे डिवचायची, मला वाटतं त्यांनी माझ्या नादाला लागू नये, मी सोपा डिवचायचा माणुस नाही. मी जर उलटा फिरलो, तर तुम्हाला सुद्धा नीट सोडाणार नाही. देवाने तुम्हाला जेवढं डोकं दिलं आहे, निश्चितच त्यापेक्षा जास्त आम्हाला दिलं आहे. मविआ सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री असताना जीओ टॅगिेंचा जीआर आला. जीओ टॅगिंच्या नवाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुध्दा पुढच्या आधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बघा. महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्टेशन आहे, कोण डायरेक्टर आहेत. हे सुद्धा पुढच्या आधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कळंल, ते म्हणाले पहिल्या दिवशी ते कळंल तर मग हे ही पहिल्या दिवशी कळंल.



Comments