top of page

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! मराठा आरक्षण अमंलबजावणीसाठी 30 मे पासून उपोषण

May 16
2 min read

जालना : सातत्याने आंदोलन करुनही शासन मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही, बलिदान देणार्‍या बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक अनुदानासह सरकारी नोकरी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून पुन्हा आंदालनाचा इशरा दिला आहे. सरकारने तत्काळ मागण्यांची सक्षम आंमलबजावणी करावी अन्यथा 30 पासून आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाचा इशार मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (दि.16) आंतरवाली सराटी येथे आयोजीत पत्रकार परिषद (बैठक) मध्ये दिला.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. मराठा आरक्षणाच्या आंमलबजावणीसाठी जरांगे पाटील 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा अमरण उपोषणाला बसणार आहेत. आज आंतरवाली सराटीत, मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ मी 30 मे पासून आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करणार आहे. जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मे रोजी येणार आहे. तीन कोर्टापेक्षा जास्त मराठ्यांचे आंदोलन तुम्हाला दिसेल”


यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात अ‍ॅडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही, ही सरकारची भूमिका आहे” ते म्हणाले, “ सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का?”


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांचं नावं घेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत, मी प्रामाणिक आहे, आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली, मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजेत. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा जीआर काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाल मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा आर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहेत.”


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “ फडणवीस साहेब, या गोरगरिबांची मने जिंका, तुमच्या 50 पिढ्या आल्या तमरी मी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही. फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये, आंदोलनाच्या तारखेच्या आता प्रमाणपत्र द्या .58 लाख नोंदी सापडल्या त्याचे सर्व प्रमाणपत्र द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटले. तसेच फडणवीसांनी करावे.”

Comments


bottom of page