‘अंत्योदय अन्न योजना’ एक जीवनरेखा; कोट्यावधी लोकांना दिलासा
- Navnath Yewale
- Aug 4
- 1 min read

दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणार्या देशातील लाखो कुटुंबांसाठी केंद्र सरकारची ‘अंत्यादय अन्न योजना’ ही जीवनरेखेपेक्षा कमी नाही. 2000 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने गरीब कुटुंबांना स्वस्त दरात रेशन देऊन उपासमारीची कमी केलीच नाही तर कोट्यवधी लोकांना दिलासाही दिला आहे.
योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य अतिशय कमी किमतीत मिळते. विशेष म्हणजे, अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि पात्र लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे त्याचा लाभ घेऊ शकतात. ही योजना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना काही राज्यांमध्येच चालत होती, परंतु नंतर ती देशभर लागू करण्यात आली.
या योजनेचा उद्देश देशातील सर्वात गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे आहे. सरकारला असे वाटते की, ज्या कुटुंबाकडे कमाईचे साधन नाही, असे कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये. दरम्यान, या योजनेचा लाभ अशा कुटुंबांना दिला जातो जे दारिद्रयरेषेखालील आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत आहे. यामध्ये भूमिहीन कामगार, विधवा किंवा एकट्या महिला, आधार नाही वृद्ध लोक, अपंग व्यक्ती, झोपडपट्टीत राहणारे अत्यंत गरीब कुटुंब, आदिवासी आणि आजारी लोक ज्यांचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही आशा कुटुंबांचा समावेश आहे.
योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो रेशन मिळते. त्यात साधारणपणे 20 किलो गहू- प्रति किलो 2 रुपये,15 किलो तांदूळ - प्रति किलो 3 रुपये, काही राज्यांमध्ये, भरड धान्य देखील कमी किमतीत दिले जाते.



Comments