top of page

अखेर ‘ऑपरेशन टायगर’ फेल, गेम फिरला शिंदे गटाला मोठा धक्का

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदारांनी बंड केला आहे. या बंडखोर आमदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे. आता ठाकरेंच्या सर्वच खासदारांना या व्हीपचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच मोठी माहिती समोर आली आहे. बंड केलेल्या एकूण सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, शिवसेना ठकारे पक्षाने जारी केलेल्या व्हीपनुसार ठाकरेंच्या संसदीय पक्षाची उद्या म्हणजेच 18 जून रेाजी एक बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित रहाणे बंधनकारक ठरणार आहे. या बैठकीला किती खासदार येणार किती गैरहजर राहणार यावरून नेमके किती खासदारांनी बंड केले हे स्पष्ट होणार आह त्याआधी ठकारे गटासाठी काहीशी दिलासादायक बाब म्हणजे सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची शक्यता आहे.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या एकून खासदारांपैकी तीन खासदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. या तिन्ही खासदारांची नावे अनिल देसाई, विनायक राऊत आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. तर सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातील दोन खासदार येण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे यांच्या बैठकीला हजर राहू शकतात. सोबतच इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात.


दरम्यान, ठाकरे गटाचे नेते या दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. सोबत या ,खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना द्यावयाच्यसा पत्रावर सही केलेली नाही. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

Comments


bottom of page