top of page

जगात जर्मनी, भारतात परभणी: शिवसेनेच्या बंडोबा खासदारांना परभणीकरांनी कायमचाच धडा शिकवला; 38 वर्षाचा रंजक इतिहास

परभणी : जगात जर्मनी, भारतात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणार्‍या परभणीचा राजकीय पॅटर्नही काहीसा वेगळाच आहे. 1989 पासून परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या ठिकाणचा एक वेळेसचा अपवार वगळता सलग सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. त्याशिवाय परभणी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन गद्दारी करणार्‍या खासदारांची संख्या काही कमी नाही. पण परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या 38 वर्षात पक्ष सोडणार्‍या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवला आहे की, पक्ष सोडताना प्रत्ये जण दहा वेळा विचार करतो.... की पक्ष सोडायचा की नाही.



नव्वदच्या दशकानंतर मराठवाड्यातील आठही लोसभा मतदारसंघावर भाजप- शिवसेनेचे प्रभुत्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जाहीर सभांमधून नेहमी गद्दारांना लाथाबुक्यांनी तुडवा, असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे. त्याचमुळे परभणीत प्रत्येकवेळी पक्षाशी गद्दारी झाली, लोकांनी त्यांना घरी बसवले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात मुळच्या शिवसेनेच्या आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवार्‍या मिळवल्या, जिंकले पाच-दहा वर्षे खासदारकी भोगली आणि एवढे होऊन पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत निघूनही गेले. अशोक देशमुख या जिल्ह्यातील पहिल्या खासदारापासून ते आतापर्यंतच्या अ‍ॅड. गणेश दुधगावकर यांच्यापर्यंत सर्वांच्याच बाबतीत हा अनुभव आला आहे.


अशोक देशमुख, अ‍ॅड. सुरेश जाधव,तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगांवकर या पैकी अनेकांनी तर दहा वर्ष खासदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केलं.. पण कालांतरानं पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत कुणी काँग्रेस,तर कुणी राष्ट्रवादीची वाट धरली. वीस-बावीस वर्ष उलटली तरी शिवसेनेच्या या राजकीय परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नाही.


1990 च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. परभणी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा 1989-90 साली शिवसेनेच अशोक देशमुख,1991-96 मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख यांना पुन्हा निवडून दिले. मात्र त्यांनी या निवडणुकीनंतर पक्ष सोडला. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अशोक देशमुख यांना खासदार केले. पुढे केंद्रातील नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केले. त्यामुळे देशमुखांना 1996 च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. पण परभणीतले हे बंड बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगलच जिव्हारी लागल.. त्यांनी फारशी राजकीय ओळख नसणार्‍या सुरेश जाधव यांना निवडणुकीत देशमुखांविरुद्ध मैदानात उतरवले.. नवख्या असलेल्या सुरेश जाधव यांनी अशोक देशमुख यांना अस्मान दाखवले होते.


त्यानंतर 1990 च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव केला. हा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघात शिवेसेनेच्या वाट्याला पराभव आलाच नाही. 1999 मध्ये शिवसेनेने मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले.पण सुरेश जाधवांनीही सन 2004 च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. मग शिवसैनिकांनी त्यांनाही घरी बसवले होते.


2004 मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील हे शिवसेनेचे परभणीचे खासदार झाले. पण अणू करारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश झुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली. 2009 मध्ये त्यांनी शिवसेनेविरोधातच परभणी विधानसभा लढवली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रेंगे पाटलांना चारी मुंड्या चित्त केले होते. या माध्यमातून पक्षा सोडणार्‍या मंडळींना शिवसैनिक धडा शिकवतात हे दाखऊन दिले.


शिवसेनेने 2009 मध्ये मात्र नवा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेर आलेल्या माजी राज्यमंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणुक रिंगणात उतरविले. दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर जाणं पसंद केलं..


दरम्यान, परभणी लोकसभा लोकसभा मतदारसंघाचा ईतिहास पाहिला तर अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगांवकर अशी शिवसेनेसोबतच बंड करणार्‍या खासदारांची मोठी परंपरा आहे. तयच मुळे येत्या काळात शिवसेनेसोबत बंडखोरी करण्याचं धाडस कोणी करू शकेल असे वाटत नाही. परभणीत जर शिवसेनेसोबत कोणी बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसविण्यासाठी सज्ज असतात असा हा गेल्या 38 वर्षाचा इतिहास आहे. त्यानंतरच्या काळात याठिकाणी 2014 पासून संजय जाधव सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत. मोदी लाटेत देखील ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात याठिकाणी काय घडणार? याबाबतचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.

Comments


bottom of page