top of page

ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात पडसाद; सोशल मीडियावर ओराजे निंबाळकर ट्रोल!

शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठकारे पक्षाच्यसा सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यसांचाही समावेश आहे. शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडली त्यावेळी ओम राजे खंबीरपणे ठाकरेंच्या मागे उभे राहिले होते. आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघातही उमटू लागले आहे.


कुणीही फुटले तरी ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहतील, असे धाराशिवमधील सेनेचे कार्यकर्ते ठाकपेण सांगत होते. खुद्द राजेनिंबाळकर यांनीही अनेकदा 2022 च्या फुटीनंतर ठकारेंची सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.


ओम राजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर धाराशिवमधील ठाकरेंच्या पक्षाच्या पाच नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत राजेनिंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे ठरविण्यात आले. याबाबत माहिती देताना एका नगरसेवकाने सामशी बोलताना सांगितले की, लोकहितासाठी कुठलाही निर्णय घेतला तर चांगलाच असतो. शेवटी राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी असते, त्यामुळे घेतलेला निर्णय योग्यच आहे. सत्तेत नसल्याने आम्हाला न्याय मिळत नाही. कामे वेळेवर होत नाहीत.


ओमराजे यांच्या भूमिकेनंतर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसते. तर काही कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओमराजे शिंदे गटात जात असतील तर ते वेदनादायी आहे. ओमराजे आमच्यासाठी भावासारखे आहेत. त्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले. एवढे करूनही ते असे करत असतील तर निषेधार्ह आहे. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.


दरम्यान, सोशल मीडिया ओमराजे ट्रोल होत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी सोशल मीडियात पेास्ट केली आहे. खासदार संजय राऊत यांनी तर गंभीर दावा केला आहे. ओमराजे यांच्या वडिलांच्या हत्येच्या केसचा निकाल त्यांच्याबाजूने देण्याची ऑफर ओमराजेंच्या दिल्याचा दावा राऊतांनी केला आहे. काल या प्रकरणाचा मुंबईतील कार्टाकडून निकाल दिला जाणार होता. पण निकालाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. त्यावर राऊतांनी हा दावा केला आहे.

Comments


bottom of page