अखेर रुपाली चाकणकरांना खरात प्रकरण भोवलं; राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

मुंबई: विकृत,भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकरणकर यांनी राजीनामा सोपवला आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा सोपवला आहे. याआधी चाकरणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपादाचही राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आता त्यांनी राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी सोशल मिडियावर राजीनाम्याबाबत एक पोस्ट केली आहे. खरात प्रकरणात पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांतून होत आहेत, ते वेदनादायक आहेत. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री , मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. अशी पोष्ट रुपाली चाकणकर यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काल रुपाली चाकणकर यांचे नांव खरात प्रकरणात आल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. शिवाय पक्षाच्या नाशिक जिल्हा पदाकिधार्यांसह कार्यकर्ती महिलांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तसे निवेदन राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आले होते. रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याने त्यांच्या राजीनाम्यावर बैठकीतच शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार आज सकाळी रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला आहे.
दरम्यान , विकृत भोंदूबाबा अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे.त्याचावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एसआयटीकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाल्याने त्यांनी राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरही चाकणकर यांच्यावर गंभीर आरोपांसह टीका सुरूच होती , आखेर आज त्यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, अहिल्यानगरच्या खबरदार पुढारी दैनिकाच्या संपादकास कॅप्टन बाबा च्या संदर्भात छापलेल्या बातमीचा वर्षभरापूर्वी खुलासाही रुपाली चाकणकर यांनी छापण्यास भाग पाडले होते. पोलिस यंत्रणेवर दाबाव टाकून पत्रकारास बातमीचा खुलासा छापण्यास भाग पाडल्याचा आरोपही सबंधीत पत्रकाराने केला. अशोक खरात प्रकारणात स्वपक्षातील रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली. सुषमा अंधारे, अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांनी चाकरणकर यांच्या पक्षीय पदाच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर आरोपांसह टीकेची झोड उठवली.



Comments