top of page

अजितदादा: कधी मध्यरात्रीचा खेळ, तर कधी 80 तासांचे सरकार !

आज 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला. राज्याचे दिग्गज नेते आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेले अजित पवार यांचे बारामतीजवळ एका दु:खद विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर एक शक्तीकेंद्र होत. ज्यांनी गेल्या 13 वर्षात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून विक्रमी शपथ घेऊन इतिहास रचला, डिसेंबर 2024 मध्येद सहाव्यांदा पदीार स्वीकारल्यानंतर, ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारमधील सर्वात मजबूत दुवा राहिले.


22 जूलै 1959 रोजी जन्मलेल्या अजित पवार यांनी वयाच्या 20 व्या वर्षी एका सहकारी संस्थेत आपला प्रवास सुरू केला आणि शरद पवारांचा वारसा पुढे नेत महाराष्ट्राचे सर्वात प्रभावशाली प्रशासक म्हणून स्वत:ला सिद्ध केले. आज त्यांच्या जाण्याने बारामतीपासून मुंबईपर्यंत एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरुन काढणे अशक्य आहे.


सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवार यांनी गेल्या 13 वर्षात सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विविध विचारसरणीच्या सरकारांना मागृ दाखवण्यात ते पारांगत होते. महाराष्ट्रातील ते असे नेते आहेत ज्यांनी सलग नाही तरी सर्वाधिक वेळा हे पद भूषवले आहे. डिसेंबर 2024 पासून ते राज्याचे आठवे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचा महत्वाचा भाग बनले.

20 वर्षाचा पदार्पण आणि “ बारामती” चा बालेकिल्ला असलेल्या अजित पवारांचा राजकीय प्रवास अहमदनगर जिल्ह्यातून सुरू झाला, परंतु बारामती ही त्यांचा खरा आधार बनला. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी साखर सहकारी संस्थेसाठी पहिली निवडणुक लढवली. त्यांनी अनेक वेळा बारामतीचे आमदार म्हणून काम केले. त्यांनी एकदा लोकसभा निवडणुकही जिंकली, परंतु त्यांचे काका शरद पवार यांच्यासाठी त्यांची जागा सोडली.


दरम्यान, शेतीपासून ते जलसंपदा पर्यंत, प्रशासकीय कौशल्याच्या बाबती अजित पवार हे सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेती, वीज, जलसंपदा आणि फलोत्पादन यासह अनेक महत्वाच्या मंत्रालयाचा कार्यीार सांभाळला. जलसंपदा मंत्री असताना त्यांनी राज्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांवर काम केले, जरी हे प्रकल्प नंतर वादग्रस्त ठरले.


80 तासांचे सरकार : 23 नाव्होंबर 2019 ची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ‘मध्यरा़त्रीचे ऑपरेशन’ होते. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. शरद पवारांच्या इच्छेविरुद्ध झालेल्या या बंडाने संपूर्ण देशाला धक्का दिला. परंतु बहूमत नसल्यामुळे सरकार केवळ 80 तास टिकले. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर आणि आमदार परल्यानंतर, ‘दादा’ यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यामुळे त्यांन बंडाचा एक नवीन अवतार आणि नंतर नाट्यमय पुनरागमन मिळाले.


अजित पवार हे एक कठोर प्रशासक आणि संघटक म्हणून पाहिले जात होते. त्यांचे काका शरद पवार यांच्याशी असलेल्या मतभेदांच्या बातम्या वारंवार माध्यमांच्या मथळ्यांमध्ये येत असल्या आणि पक्षात फूटही पडली असाली तर, त्यांनी नेहमीच स्वत:ला त्यांच्या वडिलांचे अनुयायी म्हणून जाहीर केले. आज त्यांच्या निधनाने देशभरात धक्का बसला आहे.

Comments


bottom of page