अजितदादांचा हा 12वा अर्थसंकल्प ठरला असता पण ..., उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक
- Navnath Yewale
- 4h
- 2 min read

मुंबई : अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत कधीही तडजोड केली नाही. दादांच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक घडी लागली. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यंदा त्यांचा हा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. अर्थसंकल्पावर त्यांचे काम पूर्णही झाले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दादा आपल्यात नाहीत पण त्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण कराचे असल्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्याविना होणारे 35 वर्षातले हे पहिलेच अधिवेशन असेल, अजित पवार यांचे राज्याच्या विकासात असलेले अग्रणी स्थान सुनेत्रा पवार यांनी अधोरेखित केले. दादांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या.
मंत्री सुनेत्रा पवार म्हणल्या की, “अजितदादांनी आर्थिक शिस्तीत कधीही तडजोड केली नाही, अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांंडला. आदरणीय दादांनी पहिला अर्थसंकल्प 2011 सालरी सादर केला होता. त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता तो एक लाख 44 हजार 783 कोटी रुपयांचा होता. तर मागच्या वर्षी म्हणजे 2025 साली अजितदादांच्या कारकिर्दीतील अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प 7 लाख 20 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. ही फक्त आकड्यांची वाढ नाही तर महाराष्ट्राला सर्वांगिण विकासाकडे नेण्याचा प्रयत्न आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
दिवंगत नेते वानखेडे साहेबानंतर सार्वाधिक काळ अर्थसंकल्प मांडण्याचा मान दादांना मिळाला. यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांच्या काळातला 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते, अचानक ते आपल्याला सोडून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत करण्यासाठी अजितदादा झटायचे, त्यांच्या माघारी यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. माझे हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशन व्यवस्थित पार पडेल अशी अशा आहे”.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय नेते होते. त्यांच्याएवढी आर्थिक शिस्त मी पाहिली नाही. अधिवेशन आणि अर्थसंकल्प म्हटले की अजित पवार यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष असायचे. पण अजित पवार यांच्यावर नियतीने अन्याय केला. दादा आज आपल्यात नाहीत पण राज्याच्या विकासाचे त्यांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.



Comments