एपस्टीन फाईल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा- अॅड. प्रकाश आंबेडकर , 2 मार्चला मुंबईत सीएसएमटी समोर निदर्शने; सहभागी होण्याचे आवाहन
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ 2 मार्च 2026 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) समोर भव्य निदर्शने करण्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केली आहे.
विविध समाजिक संघटनांच्या वतिने मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्यांवर चर्चाकरण्यात आली. ज्यामध्ये एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने एक ईमेल असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच अमेरिका-भारत व्यापारी करारामुळे भारत अमेरिकेचा गुलाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या जुन्या वादांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली.
दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे म्हटले आहे की, एपस्टीन फाईलमध्ये जेफ्री एपस्टीनने मोदींना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी इस्त्रायल दौर्यात नाच-गाणे करण्याचा सल्ला दिला होता. त्या दौर्यात पंतप्रधान मोदी यांनी नाचगाणे केल्याचा उल्लेख इमेल मध्ये आला आहे. केंद्र सरकारने देशाला गहाण ठेवल्याचा आरोपही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अमेरिकेसोबत झालेला करार केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित नसून, भारताची विदेश नीती, अर्थ नीती आणि आरोग्य नीती आत अमेरिका ठरवणार आहे. पंतप्रधानांनी देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधले आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. हा देश विकण्यापासून वाचवण्यासाठी 2 मार्च रोजी होणार्या निदर्शनांत तमाम जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.



Comments