कर्नाटकात नेतृत्व बदलाचे वारे, मुख्यमंत्री सिद्धरामैया विरोधात आमदार एकवटले
- Navnath Yewale
- Feb 22
- 1 min read

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी नेतृत्व बदलाची उघडपणे मागणी केली आहे. डी.के. शिवकुमार 26 फेब्रूवारी रोजी दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांकडची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लिंगायत आणि वोक्कालिगा मतदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे.
रविवारी (दि.22) काँग्रेस आमदार एच.ए.इक्बाल हुसेन यांनी नेतृत्व बदलाच्या मागणीला दुजोरा देत म्हटले की, आम्हाल बदल हावा आहे. इतरांनाही संधी द्यावी, अशी आमची भूमिका आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊनच आम्ही हा बदल सुचवत आहोत. हायकमांडने नेतृत्व बदलाबाबत असेलेला संभ्रम लवकर दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली माझ्यासह अनेक आमदार आणि मंत्र्यांची हीच भूमिका आहे. कोणताही संभ्रम न ठेवता याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना 26 फेब्रूवारी रोजी पुन्हा दिल्लीला बोलवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, सिद्धारमैया गटाने मुख्यमंत्री बदलाची मागणी सातत्याने फेटाळून लावली आहे, तर शिवकुमार गटाने नेतृत्व बलावर ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. शिवकुमार यांनी फेब्रूवारी अखेरपर्यंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.
दरम्यान, काँग्रेस हायकमांडसमोर राजकीय समतोल राखण्याचे मोठे अव्हान आहे. शिवकुमार यांना पाठिंबा दिल्यास सिद्धरामैया यांच्याशी जोडलेल्या लिंगायत आणि अल्पसंख्यांक मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. उलट सिद्धारमैया यांनाच कायम ठेवल्यास शिवकुमार यांच्याशी संबंधित वोक्कालिगा समाज आणिसंघटनात्मक यंत्रणेचा उत्साह कमी होण्याची भीती आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चर्चेत सहभागी करून सामूहिक निर्णय घेण्याचे अश्वासन दिले आहे. 26 फेब्रूवारीच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनाही चर्चेसाठी बोलावले जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



Comments