अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसणासाठी जागेची चाचपणी!शिरुरची बाजारपेठ स्थिरावण्यासाठी व्यवसायिक कॉप्लेक्स उभारणार - मुख्याधिकारी दहिफळे
- Navnath Yewale
- Jan 17
- 2 min read

बीड : शिरुर कासार शहरातील वाढत्या रहदारीनुसार अवास्तव अतिक्रमणामुळे बाजारपेठेलाच स्थलांतराचे हादरे बसत आहेत. शहरची नावाजलेली बाजारपेठ स्थिरावण्यासाठी अतिक्रमणासह बाजारकरूंच्या मुलभूत सुविधांसाठी उपाययोजनांचा पर्यायासाठी नगरपंचातीचे मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांनी शुक्रवारी (दि. 16) शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या पहिल्या टप्यात प्रारंभ केला. लवकरच शहरातील मोकळ्या जागेत व्यवसायिक कॉम्पलेक्स उभारण्यासाठी जागेची चाचपणी करण्यात येणार असून बीओटी तत्वावर गाळे वाटपामध्ये अतिक्रमणधाराकांच्या पुनर्वसास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी दहिफळे म्हणाले.
शिरुर शहराची जुनी बाजारपेठ निमुळत्या रस्त्याअभावी जिजामाता चौक ते छत्रपती संभाजीमहाराज चौक या मुख्यरस्त्यावर मागील पंधरा वर्षापासून स्थिरावली आहे. पारंपारिक आठवडी बाजार जुन्या बाजार तळावरच भरत असला तरी जागे अभावी शेळ्यांच्या बाजारावर टाच आली असून बैल बाजार लॉकडाऊनच्या कालावधीपासून बंद आहे. निमुळते रस्ते, पार्कींचा अभाव, वाढते अतिक्रमण या नियमित समस्यांमुळे रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, स्वच्छातगृहांचा प्रश्न जटील बनला आहे.
तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवरील निमुळत्याची आडकाठी, स्वच्छतागृह यासह बाजारपेठेचा कोंडलेला श्वास मोकळा होणार कधी? मुलभूत गरजांची फळे नगारिक चाखणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर तुंबलेल्या नाल्यातून दुर्गंधीयुक्त पाणी प्रवाहीत होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंबलेल्या नाल्यां प्रवाहीत करण्यासाठी किमान नालीवरील अतिक्रमण हटविणे अवश्यक असल्याचे सामान्य नगारिकांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
शहराचे वैभव टिकविण्यासाठी किमान बाजारपेठ स्थिरावणे ही काळाची गरज असल्याने कर्तव्यकठोर, निष्पक्ष तरुण मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांनी शुक्रवारी थेट अतिक्रमणावरच बुलडोझर फिरवण्यास सुरूवात करून शहर विकासाला नवी दिशा देण्यास प्रारंभ केला आहे. निमुळत्या रस्त्यांमुळे शहराच्या जुन्या बाजारपेठेतून व्यवसायीकांनी छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिजामाता चौक या मुख्यरस्त्यावर स्थलांतर केले हे वास्तव नकाराता येणार नाही. प्रत्यक्षत शहर विस्तारीकरणामुळे बाजारपेठे वाढते हे सत्य असले तरी किमान मुख्य बाजारपेठ स्थालांतरीत होणं हे शराच्या वैभवाला खिळ बसण आहे.
दरम्यान शिरुर शहराच्या विकासाला चालणा देण्यासाठी प्रसंगी कर्तव्य कठोर निर्णय घ्यावे लागले तरी मागे हटणार नसल्याचे सांगत मुख्याधिकार्यानी शिरुरकरांच्या मुलभूत गरजांसाठी उपाय योजनांचा रोडमॅप सांगितला आहे. मुख्याधिकारी दहिफळे म्हणाले की, शहरविकासाठी सभागृहाची धडपड आणि पदाधिकार्यांची तळमळ लक्षात घेवून लवकरच शहरातील मुख्यरस्त्याच्या नाल्यांवरील अतिक्रमण हटवून तुंबलेल्या नाल्या प्रवाहित करण्यात येणार आहेत. नियमित पाणीपुरवठ्यासाठी उपाय योजना राबवून कुलूप बंद स्वच्छतागृह वापरासाठी खुले करण्यात येणार आहेत. टप्प्या टप्प्याने वाहतूकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील अतिक्रमण, शहराचे वैभव टिकविण्यासाठी प्रत्येक चौकाचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यात येणार आहे.
जागेचे कारण पुढे करत तालुकास्तरीय प्रशासकिय कार्यालये नगरपंचायत कार्यक्षेत्राच्या बाहेर गेली आहेत. त्यामुळे शिरुर शहराच्या शाश्वत विकासाला दृष्ट लागल्याचे चित्र आहे. किमान आहे ते टिकवण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्याची वेळ येवून ठेपली आहे. नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेत शहरवासीयांनी स्वयंपूर्तीने सहभागी होण्याचे गरज आहे.
शहराचे वैभव टिकून बाजरपेठ स्थिरावण्यासाठी लवकरच शहरात व्यवसायिक कॉम्पलेक्सचे ट्रक्चर उभारण्याच्या उद्देशाने जागेची चाचपणी करण्यात येणार आहे. बीओटी तत्वावर गाळे उभारुन अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनास प्राधान्य दिले जाणार असल्याने शहरवासीयांनी विधायक कामासाठी सहकार्याचे आवाहन मुख्याधिकारी दहिफळे यांनी केले आहे.
शहरवासीयांसह बाजारकरूंच्या मुलभूत गरजांना प्राधान्य: शहरातील रस्ते, नाल्या, धुळ, स्वच्छता, स्वच्छतागृह यासह नियमित पाणीपुरठ्याच्या कामांना प्राधान्य देवून पहिल्या टप्यात विकास कामांना अडसर ठरणारे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.
मुख्यरस्त्यारील अतिक्रमणावर हातोडा : तुंबलेल्या नाल्या प्रवाहित करण्यासाठी लवकरच छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिजामाता चौक या मुख्यरस्त्याच्या नाल्यांवरील अतिक्रमणावर हातोडा पडणार आहे. नागरिक व्यवसायिकांनी स्वयंपूर्तीने अतिक्रमण हटवून विधायक कामात योगदानाचे द्यावे.
मुख्याधिकारी गणेश दहिफळे



Comments