अपह्रत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून मारहाण पोलिस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

बीड : अल्पवयीन मुलीचे अहपहरण झालेल्या पिडीत कुटुंब, नातेवाईक तपासाची माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले असता पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी नेकनुर पोलिसात सात जणांसह इतर एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
धावज्याचीवाडी येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मारहान करून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार नेकनूर पोलिसांनी केला. याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांसह इतर एका अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
धावज्याचीवाडी येथील एक अल्पवयीन मुलगी डिसेंबर 2025 पासून गायब आहे. या प्रकरणात नातेवाईकांनी तक्रारही दाखल करून दोन महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. मुलीच्या वडिलांनी संशयितांची नाव देखील सांगितली आहेत. मात्र, पोलिसांच्या हाती अजून काहीच लागले नाही. पिडीत कुटुंबाने पोलिस ठाण्यात ठिय्या दिला . ठाण्याचे उंबरे झिजवले मात्र पोलिसांनी समाधानकारक उत्तर कधीच दिले नाहीत. असा आरोपही पिडित कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, मंगळवारी पिडित कुटुंब नातेवाईकांसोबत पोलिस ठाण्यात आले असता नातेवाईकांना पोलिसांनी मारहाण केली. पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. शिवाय वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार अशोक काळकुटे यांनाही दमदाटी करण्यात आली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबल नाही तर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये संशयित आरोपीचे नातेवाईक रुख्मिण पांडूरंग चोबे, धर्मा रघुनाथ खिल्लारे या दोघांना चौकशीसाइी पोलिस ठाण्यात बोलावले होते. मात्र अपहरण झालेल्या मुलीचे पिडीत कुटुंब न बोलवता पोलीस ठाण्यात ते वेळेत हजर झाले.
पिडित कुटुंबाला तपासाची माहिती देण्यात आली. दरम्यान, फिर्यादीचे व आरोपीचे कुटुंब बाहेर पडत असताना एकमेकांना शिवीगाळ करू लागले. एकमेकांना मारहाण देखील करू लागले. हा प्रकार पोलिसांनी सोडवला. या प्रकारामुळे सामाजिक शांतता भंग झाली. पोेलिस ठाणे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी पोलिसांनी रुक्मिणी पांडुरंग चोबे, कृष्णा गोविंद चोबे, पांडुरंग बाबासाहेब चोबे, धर्मा रघुनाथ खिल्लारे, बब्रुवाहन नवनाथ गायकवाड, गवळणबाई बब्रुवाहन गायकवाड, बिभीषण हरिदास भोसले व इतर अन्य यांच्या विरोधात पोलिस हवालदार सतीश राऊत यांच्या फिर्यादीवरुन कलम 149 (2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेेश पोलिस अधीक्षक नावनीत कॉवत यांनी दिले आहेत. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकरणाची चौकशी करणार असून नेकनूर पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीपासून चौकशीला सुरूवात होणार आहे.



Comments