अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार, कारचालकासह रिक्षाचालक जखमी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांच्या मागावर पोलिस; सुदैवाने टायगर श्रॉफला इजा नाही

मुंबई: मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये टायगर श्रॉफ आणि रिक्षा चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ हा फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यात अभिनेता टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ यांना गोळीची इजा झालेली नाही.
अभिनेता टायगर श्रॉफ हे जुहू येथे फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते, रात्री 7:00 वाजेच्या सुमारास ते आपल्या कारमधून प्रवास करत असताना अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही दिवसांपूर्वी वडाळामध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आता अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांनी गोळीबार केला आहे.
जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी टायगर श्रॉफ यांच्याकारवर गोळीबार केला या हल्ल्यात टायगर श्रॉफ आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याची माहिती आहे. कारच्या बुलेटप्रूफ ग्लासमुळे सुदैवाने टायगर श्रॉफ यांना गोळीची इजा झाली नाही असी माहिती समोर येत असून हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. हल्लेखोरांनी किती राऊंड फायर केले, हल्ल्याचे कारण याची पोलिसांकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही. जमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Comments