top of page

अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; तीन अणुकेंद्रावर हल्ले, इराणचा गंभीर इशारा

ree


इस्त्रायल-इरणामधला संघर्ष वाढला आहे. इस्तायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरू आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील 3 अणुकेंद्र नष्ट झाल्याचा अमेरिकेने केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल माध्यमावर दिली आहे.


अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. तसेच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेने हल्ला केल्यानंतर आता इराणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा इराणने दिला आहे.


अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रावर हवाई हल्ले केल्याबद्दल इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेचा निषेध केला आहे. तसेच हे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे चार्टर आणि एनपीटी कराराचं गंभीर उल्लंघन कसल्याचं मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी म्हटलं आहे. इराणच्या शांततापूर्ण अणु कार्यक्रमावरील हल्ले अपमानकारक असल्याचंही त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.


इराणचा गंभीर इशारा :

इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी एक्सवर पोस्ट करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असेलेल्या अमेरिकेवरप शांततापूर्ण अणु प्रकल्पांना लक्ष्य करून गुन्हेगारी वर्तन केल्याचा आरोप केला आहे. सय्यद अब्बास अराक्ची यांनी म्हटलं की, “ आज सकाळच्या घटना अत्यंत भयानक आहेत आणि त्यांचे कायमचे परिणाम होतील. संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्याने या अत्यंत धोकादायक, बेकादेशीर आणि गुन्हेगारी वर्तनाबद्दल सावध असलं पाहिजे”. दरम्यान, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणने स्वसंरक्षणाचा अधिकार वापरण्यासाठी सर्व पर्याय राखून ठेवले असल्याचं म्हटलं आहे.


अमेरिकेच्या हल्ल्यात नष्ट झाले इराणचे 3 अणुकेंद्र :

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्त्रायली अधिकार्‍यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू -57 बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील 3 अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

Comments


bottom of page