गोव्यात रशियन सिरियल किलर: दोन रशियन महिलांची गळा कापून हत्या
- Navnath Yewale
- Jan 20
- 2 min read

रशियन नागरिक असलेल्या अलेक्सेई लिओनोव्हने गोव्यात आपल्या दोन मैत्रिणींची उसणे घेतलेल्या पैशांवरुन आणि रबर काऊन वरून हत्या केली असावी, अशी माहिती गोव्याच्या वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे. एलेना वानेवा आणि एलेना कास्थानोवा अशी ओळख पटलेल्या दोन्ही पिडीत महिला रशियन नागरिक होत्या आणि त्या आरोपीच्या मैत्रिणी होत्या. एलेना कास्थानोवा ही एक फायर डान्सर होती. तिने आरोपीकडून काही पैसे आणि एक फायर क्राउन (डान्सरकडून डोक्यावर आग ठेवण्यासाठी वापरला जाणारा रबराचा मुकुट) उसने घेतले होते. आरोपी स्वत: फायरवर्क कलाकार होता. दुसर्या महिलेनेही पैसे उधार घेतले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.
मात्र दोन पिडीत महिला अलेक्सीला पैसे आणि मुकुट परत करू शकल्या नाहीत. यामुळे चिडून त्याने 14 आणि 15 जानेवारी रोजी वेगवेगळ्या दिवशी त्यांची गहा चिरुन हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक माहितीनुुसार , हे खून पूर्वनियोजित नव्हते, संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केलं होतं. अलेक्सी ‘अतिशय वेडसर’ होता आणि त्याला सहज राग येत असे , गुन्हे घडले त्यावेळी आरोपीने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का? याचा पोलिस तपास करत आहेत.
बबल आर्टिस्ट असलेली एलेना वानेवा 10 जानेवारी रोजी गोव्यात आली होती. तर कस्तानोव्हा गेल्या वर्षी 25 डिसेंबरपासून राज्यात होती आणि अटक केलेल्या आरोपीसोबत राहत होती. हे दोघे देशाच्या विविध भागांंमध्ये काम करत असत आणि वारंवार गोव्याला भेट देत असत.
अलेक्सेईकडे भारताचा दिर्घकालीन व्हिसा होता आणि तो कामासाठी देशातील अनेक शहरांमध्ये राहिला होता. तो वारंवार गोव्याला भेट देत असे आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो पुन्हा राज्यात परतला होता. अलेक्सेई छोटी- मोठी कामे करायचा आणि दिवसभर प्रवास करायचा. आरोपीने जवळपास महिनाभरापासून कोणतेही काम केलेले नाही अशीही माहीती आहे.
दरम्यान, गोवा पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने दावा केला आहे की त्याने आणखी पाच लोकांची हत्या केली आहे, ज्यांच्याशी त्याचे काही वाद होते आणि त्याने त्यांची नावेही सांगितली. परंतु जेव्हा पोलिसांनी पडताळणी केली, तेव्हा त्यांना आढळले की त्याने उल्लेख केलेले सर्व पाचही लोक जिवंत आहेत.
अलेक्सी मानसिक रुग्ण आहे आणि तो नेहमीच अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असतो. गोवा पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये 100 हून अधिक महिला आणि दोन पुरुषांचे फोटोळी सापडले आहेत. पोलिसांच्या मते, तो लोकांसोबत लवकर चिडचिड करायचा, पण त्यांच्याशी लवकर मैत्रिही करायचा पूर्वी गोव्यात काही पुरुषांसोबत मारामारीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. परंतु त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पोलिस गोव्यातील तिसर्या महिलेच्या हत्येशी अलेक्सीच्या संबंधाची चौकशी करत आहेत. आसामची रहिवासी असलेल्या मृदुस्मिात सैकिया ही 12 जानेवारी रोजी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. ती महिला आणि अलेक्सी एकमेकांना बर्याच काळापासून ओळखत होत आणि अनेकदा एकत्र गोव्याला जायचे. सैकिया मृतावस्थेत आढळण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 11 जानेवारी रेाजी ते दोघे एकत्र होते. प्राथमिक तपासानुसार, त्या महिलेचा मृत्यू अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला होता.



Comments