इराणमधून तत्काळ बाहेर पडा; भारतीय पर्यटकांना दूतावासाकडून तातडीच्या सूचना
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 1 min read

इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. मंगळवारपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शना दरम्यान तब्बल दोन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पालिस कर्मचार्यांचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर आता इराणमधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याची सूचना केली आहे.
बुधवारी भारताने एक सूचना जारी केली, ज्यामध्ये इराणमधील भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या प्रादेशिक तणाव आणि निदर्शनांमुळे निर्माण होत असलेल्या बिकट परिस्थितीचा हवाला देत, तेहरानमधील भारतीय दूतावासाने ही सूचना जारी केली आहे.
ज्यामध्ये म्हटले आहे की, “ पर्यटकांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी व्यावसायिक उड्डणांसह उपलब्ध वाहतुकीच्या पद्धतींचा वापर करून इराण सोडावे” हा नवीन इशारा प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आला आहे, ज्यामध्ये इराणविरुद्ध अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईची चिंता आणि देशाच्या काही भागात सुरू असलेल्या निदर्शनांचा समावेश आहे.
या शिवाय भारतीय अधिकार्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशांततेच्या क्षेत्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तेहरानमधील दूतावासाने पुन्हा एकदा म्हटले आहे की, “सर्व भारतीय नागरिकांनी आणि पीआयओंनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, निदर्शने सुरू असलेली ठिकाणं टाळावीत, इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि कोणत्याही घडामोडींसाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे ,”
भारतीय नागरिकांना त्यांचे प्रवास आणि इमिग्रेशन कागदपत्रे, ज्यात पासपोर्टआणि ओळखपत्रे यांचा समावेश आहे, ते सहज उपलब्ध होतील याची खात्री करण्याचा आणि गरज पडल्यास मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याशिवाय मदत करण्यासाठी, दूतावासाने एक आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे आणि कॉन्सुलर मदतीसाठी अनेक संपर्क क्रमांक आणि अधिकृत ईमेल आयडी शेअर केले आहेत. ज्या भारतीयांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Comments