नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; 15 जणांचा जागीच मृत्यू
- Navnath Yewale
- 4d
- 1 min read

दक्षिण अमेरिकेतील बोलिविया या देशात शुक्रवारी (27 फेब्रूवारी) मोठी दुर्घटना घडली. राजधानी ला पाझजवळील एल आल्टो शहरात बोलिविया एअरफोर्सचे हरक्युलिस सी-130 हे विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून किमान 30 जण जखमी झाले आहेत. या घटनेेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
हा अपघात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे 6 वाजता घडला. लँडिंग किंवा टेक- ऑफदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर विमानाने विमानतळाची सीमाभिंत तोडत थेट रस्त्यावर कोसळले. विमान अनपेक कार आणि इतरवाहनांवर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की अनेक वाहने पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहेत.
दरम्यान, माध्यमांच्या अहवालानुसार, हे विमान देशाच्या विविध भागांत नवीन चलनी नोटा पोहोचवण्यासाठी जात होते. अपघातानंतर रस्त्यावर नोटा विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी याचे व्हिडिओ चित्रण केले असून ते आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्थानिक अधिकार्यांच्या माहितीनुसार, या लष्करी विमानाने यापूर्वी सांता क्रूझ शहरातून उड्डाण केले होते आणि एल आल्टो येथे धावपट्टीवरून घसरून जवळील रस्त्यावर उतरल्यानंतर हा अपघात झाला.
स्थानिक मिडिया संस्था युनिटेलने बोलिवियाच्यासंरक्षण मंत्रालयाा हवाला देत म्हटले आहे की, हे विमान देशाच अंतर्गत भागांत चलन (नोटा) घेऊन जात होते. राष्ट्रीय विमान कंपनी बोलिवियाना डी एव्हिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातानंतर एल आल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले होते. तसेच, या अपघातात सहभागी झालेले विमान त्यांच्या ताफ्यातील नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



Comments