top of page

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौर्‍यावर, इस्त्रायली संसदेत हमासवर पंतप्रधान मोदींचा शब्दीक हल्ला

Feb 25
1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वर्षानंतर पुन्हा इस्त्रायलच्या दौर्‍यावर गेले आहेत. इस्तायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावर पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्त्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय जनेतच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संसदेला संबोधित करणारा हा माझ्यासाठी पहिला भारतीय पंतप्रधान असण्याचा अभिमानाचा क्षण आहे. मला पुन्हा येथे येऊन खूप आनंद झाला आहे.


पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनतेच्या वतीने मी 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या भयानक हमास दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक जीवतिहानीबद्दल शोक व्यक्त करतो. प्रत्येक कुटुबाप्रती माझ्या संवेदना आहेत. आम्ही तुमचे दु:ख समजतो. हमासचे नाव घेत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला. मोदी म्हणाले की, निष्पाप नागरिकांची हत्या सहन केली जाणार नाही. दहशतवादाला शून्य सहनशीलता असली पाहिजे. जगाने ज्याविरुद्ध एकजुटीने भूमिका घेतली पाहिजे. भारत पूर्ण आत्मविश्वासाने इस्त्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे.


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेला गाझा शांतता उपमक्रम हा एक चांगला मार्ग आहे. भारताने यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रदेशातील सर्व लोकांसाठी, पॅलेस्टिनी समस्येच्या निराकरणासह, न्याय आणि चिरस्थायी शांततेचे प्रयत्न सुरू आहेत. शांतीचा मार्ग नेहमीच सोपा नसतो, परंतु या प्रदेशात संवाद, शांती आणि स्थिरतेसाठी भारत तुमच्या आणि जगासोबत उभा आहे.


तत्पूर्वी संसदेत “ मोदी , मोदी” च्या घोषणा देण्यात आल्या. नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असं म्हणत पंतप्रधानंचे नमस्ते म्हणत स्वागत केले. ओहाना म्हणाले की, “ भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. भारत आणि इस्त्रायल हे खरे मित्र आहेत. भारताने यहुुद्यांना घर दिले. मुंबई दहशतवादी हल्ला असो किंवा पहलगाम, इस्त्रायल तुमच्यासोबत आहे.

Comments


bottom of page