ब्रिटीश डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला जाण्यापासून रोखले मुंबई विमानतळावरील घटना, गुन्हे शाखेची कारवाई
- Navnath Yewale
- Jan 19
- 1 min read

मुंबई: ब्रिटीश नागरिक आणि एनएचएस यूके चे सल्लागार डॉक्टर संग्राम पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मिडियावर भाजपविरोधात भूमिका मांडणारे डॉ. संग्राम पाटील काही दिवसांपूर्वी कुटुंबासह भारतात आले होते. मात्र, आता डॉक्टर संग्राम पाटील यांना भारतातून परत लंडनला जाताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 10 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या एका फेसबूक पोस्टच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.ही कारवाई अटक नसून केवळ चौकशीपूरती असल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले होते. यानंतर त्यांनी त्याच दिवशी आणि नंतर 16 जानेवारी रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 येथे हजर राहून आपली लेखी सादर केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर संग्राम पाटील यांनी आपण 19 जानेवारी रोजी सकाळी यूकेला परत जाणार असल्याची माहिती तपास अधिकार्यांना दिली होती. यावेळी अधिकार्यांनी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या ‘लूक आऊट सर्क्यूलर’ मागे घेतले जाईल, असे अश्वासन दिल्याचेही सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. 19 जानेवारी रोजी सकाळी 8:00 वाजताच्या इंडिगो विमानाने लंडनला जाण्यासाठी डॉक्टर संग्राम पाटील मुंबई विमानतळावर पोहोचले.
मात्र, इमिग्रेशन काऊंटरवर त्यांना थांबवण्यात आले आणि यंत्रणेकडून त्यांना परदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे डॉक्टर पाटील यांचा परतीचा प्रवास अचनाक थांबवण्यात आला. या प्रकारणाचा तापास मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी शरद धरावे व मिलिंद काथे करत असल्याची माहिती आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली होती. दरम्यान, चौकशी पूर्ण करुनही डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हा विषय आता अधिक गंभीर बनला असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.



Comments