अमेरिकेच्या द्विपक्षीय राजकारणाला सुरूंग !; एलॉन मस्कची नव्या पक्षाची घोषणा
- Navnath Yewale
- Jul 6
- 2 min read

जागतिक उद्योगपती एलन मस्क यांनी अमेरिकेत नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एक्स पोस्टवर त्यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, एलॉन मस्क यांनी नव्या पक्षाची घोषणा करत अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्थेला सुरूंग लावला आहे. मस्कच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील राजकिय समिकरणं बदणार असून तेथील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांना कोड्यात टाकले आहे.
मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सार्वजनिक आणि राजकीय विचारांमध्ये दुरावा निर्माण झाल्या नंतर मस्क यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. आता हा नवीन पक्ष अमेरिकेतील राजकारणात गेम चेंजर म्हणून उदयास येत आहे. मस्कची ‘ अमेरिका पार्टी तंत्रज्ञानप्रेमी, स्वातंत्र समर्थ आणि प्रस्थापित विरोधी मतदारांना आकर्षित करू शकतो. हे तेच वर्ग आहेत जे काही प्रमाणात ट्रम्प समर्थक मानले जातात. पारंपारिक राजकारणाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचे अश्वासन देणारा नेता म्हणून मस्कची प्रतिमा तयार होत आहे. विद्यमान राजकीय रचनेवर असमाधानी असलेल्या मतदारांसाठी मस्क यांचा नवा पक्ष आकर्षक ठरू शकतो.
दरम्यान, जर मस्कच्या पक्षाने महत्वाच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले तर ते रिपब्लिकन पक्षाच्या मतपेढीचे विभाजन करू शकते. विशेषत: ज्या राज्यांमध्ये निवडणुकांचे अंतर खूपच कमी आहे. येथे, मतांची थोडीशी फेरफार देखील निकाल बदलू शकते. ही परिस्थिती दिसते तितकी सरळ नाही. जर अमेरिकन पक्षाला डेमोक्रॅट्सना मतदान करू इच्छित नसलेल्या, परंतु रिपब्लिकन लोकांवर असमाधानी असलेल्या मतदारांचा पाठिंबा मिळाला तर ते ट्रम्पसाठी प्रेशर वॉल्व म्हणून काम करू शकते.
यामुळे अशा मतदारांना पूर्णपणे निष्क्रिय होण्यापासून किंवा अतिरिक्त तिसर्या पक्षाकडे जाण्यापासून रोखता येईल. या प्रक्रियेत, ते ट्रम्पची मतपेढी फोडण्याऐवजी तिचे रक्षण करण्यास मतद करू शकतात. याशिवाय जर मस्कचा पक्ष ट्रम्पच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त मते मिळवू शकला, तर ते अनवधानाने ट्रम्पला निवडणुक जिंकण्यास मतद करू शकते.
भूतकाळाता मस्कने त्यांच्या कंपन्याद्वारे केलेल्या नवोपक्रम आता राजकारणातही येऊ शकतात. यामध्ये एआय- आधारित मतदार विश्लेषण, डिजिटल मोहिमेच्या तंत्रांचा आधुनिक वापर, क्राउडफंडिंग मॉडेल्सचे विकेंद्रीकरण आणि पडताळणी आणि पारदर्शतेसाठी ब्लॉकचेन- आधारित मतदान प्रक्रियांचा समावेश आहे. जर मस्कने या पक्षाद्वारे नवीन राजकीय तंत्रे यशस्वीरित्या वापरून पहिली तर ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षालाही त्यांचा अवलंब करण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्याचा परिणाम व्यापक होऊ शकतो, ज्याचा परिणाम संपूर्ण अमेरिकन राजकीय व्यवस्थेवर होऊ शकतो.



Comments