आंदोलनकर्ते मंगेश साबळेंची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्त्राव
- Navnath Yewale
- Oct 3
- 2 min read
शेतकर्यांच्या प्रश्नावर मंगेश साबळेंचे उपोषण; आंदोलनाचा आज पाचवा दिवस,उपचारास नकार

छत्रपती संभाजीनगर: अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना सरसकट मदत जाहिर करावी यासह शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी गेवराई (ता. फुलंब्री) चे सरपंच मंगेश साबळे यांनी 29 सप्टेंबर पासून सिल्लोड उपविभागीय कार्यालयासमोर प्राणांतिक अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आज साबळे यांची प्रकृती खालावली त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे.
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर सरपंच मंगेश साबळे यांनी 29 सप्टेंबर पासून सिल्लोड उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत तात्काळ द्यावी, अतिवृष्टी झालेल्या भागात मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेती मालाला हमी भाव जाहिर करावा, महापूराने खरडून गेलेल्या शेतीला नुकसानीच्या तुलनेत शंभर टक्के मदत जाहिर करावी याहस विविध मागण्यांसाठी साबळे यांनी उपोषण सुरू केले.
आज आंदोलनाच्या पाचव्या दिवसी साबळे यांची प्रकृती खालावली. सायंकाळी त्यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव होवू लागल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. साबळे यांच्या प्रकृतीबाबत तपासणीसाठी आलेल्या डॉक्टराच्या टीमला उपचारास साबळे यांनी विरोध केला. रात्री उशीरा उपविभागी अधिकारी, तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी साबळे यांची भेट घेवून त्यांना उपचाराची विनंती केली. मात्र मागण्यांवर ठाम साबळे यांनी आंदोलनातून माघार घेण्यास नकार दिला. शिवाय उपचारासही प्रतिकार केला.
जो पर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येवून अश्वासन देत नाहीत तो पर्यंत आंदोलन सोडणार नाही. प्रशासन शांततेत सुरू असलेले आंदोलन दडपण्याच्या तयारीत असल्याने शेतकरी पुत्रांनी आहे त्या अवस्थेत सिल्लोडकडे रवाना होण्याचे आवाहन करत मंगेश साबळे यांनी जीव गेला तरी चालेल पण आंदोलन सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने स्थानिक प्रशासनाच्या अधिकार्यांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
सरपंच मंगेश साबळे नेहमीच सामाजीक प्रश्नावर आंदोलनाने चर्चेत असतात. शेतकर्यांच्या सिंचन विहिरींच्या मंजूरीसाठी गटविकास अधिकार्यांच्या टेबलावर नोटांचा बंडलं फेकणे, गळ्यात नोटांची माळ घालून भीक मागणे, वेड्याच्या वेषात अंगाला चिखल फासून प्रशासनासाठी भीक मागणे, प्रशासकीय कार्यालयासमोर साडी नेसून आंदोलन, बालकांना शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर डबक्यातून वाट काढावी लागते. त्याच डबक्यात बसून प्रशासनाचे लक्ष वेधणे यासह आदी समाजिक प्रश्नावर मंगेश साबळे यांचे आंदोलन लक्षवेधी ठरले आहेत.



Comments