top of page

आणखी एक विकृत खरात : मी शंकर तू माझी पार्वती म्हणत भोेंदू बाबाचा महिलेवर अत्याचवार

मुंबई अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरूनं महिलेवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘ मी शंकर तू माझी पार्वती, असं म्हणत महिलेला आपल्या जाळ्यात ओढत तिच्यावर या स्वयंघोषित गुरूने अत्याचार केला आहे. याप्रकरणी वसईच्या मागणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पेालिकसांकडे वर्ग करण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितनुसार एक 35 वर्षीय पीडित महिला पुण्यातील आहे. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली होती. आमच्या वसई या संस्थेचा प्रमुख असलेल्या या धर्मगुरूने पीडित महिलेच्या धार्मिक श्रद्धतेचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला होता. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेत. असे सांगून महिलेला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरीमधील एका लॉजमध्ये नेल. तेथे गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेचे काही अश्लील फोटोही काढली.


या फोटोवरून तो त्या पीडितेला ब्लॅकमेल करायचा. या नराधम बाबाने मे 2025 मध्ये महिलेला वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यांनतर पीडित महिलेने हिम्मत करत आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बलात्काराची पवहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

Comments


bottom of page