top of page

आमदार-खासदारांच्या सन्मासाठी अधिकार्‍यांना आता उभं राहून करावं लागणार अभिवादनशासनाचा नवा जीआर; निमंत्रण पत्रिकाही आता राजशिष्टाचारानुसार

ree

मुंबई: विधानमंडळ तसेच संसद सदस्यांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्याबाबात राज्य सरकारने नवा जीआर (दि.20) काढला आहे. या जीआरमध्ये राज्यातील आमदार खासदाराना सन्मानाची वागणूक मिळण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत. या जीआरमधून सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, कार्यालय प्रमुख, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, मंडळे, महामंडळे, शासन नियंत्रित संस्थांमधील सर्व अधिकारी कर्मचार्‍यांना विशेष मार्गदर्शक सूचना ेदण्यात आल्या आहेत.


या शासन निर्णयात विधानमंडळ सदस्य/संसद सदस्य कार्यालयास भेट देतील, त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांना आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी. तसंच आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह विधानमंड, संसद सदस्य भेटायला येतील आणि जेव्हा ते परत जातील तेव्हा अधिकार्‍यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करण्याचा आदेश देखील या जीआरमध्ये आहे. त्यासोबतच आमदार, खासदारांशी मोबाईलवर बोलणं नेहमी आदयुक्त भाषा व शिष्टाचार पाळावा, असंही या निर्णयात म्हटलं आहे.


यासह विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य यांची भेट आणि कामांचा आढावा याकरिता दर महिन्याच्या पहिल्या तिसर्‍या गुरूवारी दोन तासाची राखीव वेळ सुनिश्चित करून ती पूर्व प्रसिद्ध करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकार्‍यांनी द्यावी असं या जीआरमध्ये नमूद केलं आहे. शिवाय कोणत्याही शासकीय कार्यक्रम पत्रिकेत नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत ज्याजिल्ह्यात स्थानिक, राज्यस्तरीय, शासकीय भूमिपूजन, उद्घाटन, ईत्यादी कार्यक्रम असे त्या जिल्ह्यातील सर्वृ केंद्रीय व राज्यातील मंत्री, राज्यमंत्री, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक सर्वपक्षीय विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, नगराध्यक्ष, सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडून खात्री करूनच कार्यकम पत्रिकेत संबंधित लोकप्रतिनिधिंची नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत असं या शासन निर्णयात नमूद केलं आहे.

Comments


bottom of page