मनोज जरांगेना गोळ्या घालून मारतो, धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल वाल्मिक कराड याचं नाव घेत, जरांगे पाटील समर्थकाला धमकीचा संवाद
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

बीड: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा केल्याचा एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झालाय. कराड समर्थकाकडून ही मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कॉलवर बोलताना समर्थकाने धनंजय मुंडे यांचेही नाव घेत धमकावल्याचे ऐकू येत आहे. या कॉल रेकॉर्डिंगची वृत्तमानस पुष्टी करत नाही.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे नाव घेत धमकी देण्यात आल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. संबंधीत कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला बोलत असताना थेट मनोज जरांगे यांना मी गोळ्या घालून जिवे मारणार असल्याचे बोलत आहे. त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणाचे नाही, नसता तुलाही जीवे मारतो अशी जरांगे समर्थकालाही जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान , व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीला कॉल केला. त्यामध्ये ता म्हणतोय की, “ जरांगे पाटलयांना कधी गोळ्या घालायच्या हे सांग, मी स्वत: त्याला गोळ्या घालतो. त्याची बातमी चॅनलला दे तुझी जात वेगळी आहे. तुला फक्त त्या जरांगेचा अभिमान आहे. तुला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही.”
संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये मद्यपीने मनोज जरांगे पाटलांना अश्लील भाषेत शिवीगाळही केल्याचा संवाद आहे. तसेच या क्लिपमध्ये धमकी देणार्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केल्याचा संवाद आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही



Comments