आमदार रोहित पवार आणखी पुरवा सादर करणार अजितदादांच्या विमान अपघाताचे नवे पुरावे; रोहित पवार लवकरच पत्रकार परिषदेत माडणार असल्याचा दावा
- Navnath Yewale
- Mar 18
- 2 min read

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने अनेकांना धक्का बसला. काहींनी अजूनही दादा आपल्यात नाहीत हा विचारही पटत नाही.तर दादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचे अनेकांना वाटते. त्यात आमदार रोहित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले आहेत. त्यांनी अपघातप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले. तर याप्रकरणी तपास यंतणांच्या संथ तपासावर ताशेरेही आढले आहेत.
रोहित पवार हे मध्यंतरी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून तर अनेक विरोधी गटातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. सरकारवर दबाव टाकण्याची आग्रही भूूमीका मांडली. आमदार रोहित पवारांनी आणखी एक पुरावा सादर करण्याचा दावा केला आहे. रोहित पवार आता कोणता नवा पुरावा सादर करणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. ही या संदर्भातील अखेरची पत्रकार परिषद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेतून सर्व महत्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. विमान अपघाता संदर्भात एफआयआर दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हा दाखल होणे आवश्यक असते असेही रोहित पवार म्हणाले. तर अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात राज्यातील विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नसल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल व्हायला हवा पण तो झाला नाही. जय पवार हे सुद्धा ट्विट करतात, त्यामुळे ते पत्रकार पषिद घेतली अशी अपेक्षा असल्याचे रोहित पवार म्हणाले. आम्ही दादांच्या मृत्यूचं कधीच राजकारण केलं नाही, एवढा मोठा नेता आपल्यातून कायमचा हरपून जातो, पण ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला याबाबत तपास योग्य पद्धतीने व्हावा असं वाटत. त्यामुळे राजकारण आम्ही करतोय का ते करतात याचा विचार त्यांनी करावा. त्यांचं हे बोलणं हास्यास्पद आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. सरकारला याबाबत कोणतंच गांभिर्य नाही, कायदा सुरक्षा नावाला शिल्लक राहीला नाही असा आरोपही रोहित पवार यांनी केला.



Comments