आमदार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतील सादरीकरणानंतर डिजीसीए अॅक्शनमोड मध्ये मोठा निर्णय: व्हिएसआर विमान कंपनीचा काऊंटडाऊन सूरू
- Navnath Yewale
- Feb 11
- 1 min read

पुणे: 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरकारी यंत्रणा, डिजीसीए आणि गळ्यांनी याला अपघात म्हटलं मात्र आमदार रोहित पवारांनी आज तो अपघात नव्हता तर घात होता अशी शंका उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदेनंतर अवघ्या दोन तासांत बारामती विमान अपघाताबाबत डिजीसीए ने मोठे पाऊल उचलले आहे.
बारामती येथे झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघातानंतर नागरी विमा वाहतूक महासंचालिनालयाने म्हणजेच डिजीसीए ने मोठी कारवाई सुरू केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये एम/एस व्हिएसआर वेंच्यूर प्रा. लि. या कंपनीचं लार्जेट 45 (व्हिटी-एसएसके) विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर डिजीसीए ने गैर निर्धारित म्हणजेच नॉन-शेड्यूल विमान ऑपरेटरांचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. डिजीसीए कडून हे विशेष सेप्टी ऑडिट टप्प्याटप्प्याने राबवले जात असून, 4 फेब्रूवारी 2026 पासून या ऑडिटची सुरुवात झाली आहे.
दरम्यान, अजित पवारांच्यवा अपघातानंतर 13 दिवस उलटले तरी सरकारनं सखोल चौकशी का सुरू केली नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न सीआयडीला विमान अपघाताचा तपास करण्याचा अधिकार आहे का? हे सगळं एकत्र जोडत रोहित पवार यांनी एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला की अजित दादांचा केवळ अपघात नव्हता, तर तो एक नियोजित कट होता. अजितदादांच्या पुतण्याने (रोहित पवार) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
व्हिएसआर कंपनीचे ऑडिट होणार: पहिल्या टप्प्यात मोठ्या ऑपरेटरांचा समावेश करण्यात येत आहे. व्हिएसआर या कंपनीचाही या ऑडिटमध्ये समावेश आहे. डिजीसीए च्या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षा निकषांची सखोल जपासणी करणे आणि भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळणे हा आहे. बारामती विमान अपघातानंतर डिजीसए ने उचललेलं हे पाऊल नॉन-शेड्यूल विमानसेवेच्या सुरक्षेबाबत महत्वाचं मानलं जात आहे.



Comments