top of page

आयएएस तुकाराम मुंडे यांची वारंवार बदली; माजी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विशेष विनंती!

Jul 12
2 min read

नांदेड: आपल्या धडक आणि कडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिाकरी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता राजकीय नेते उभे राहताना दिसून येत आहे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांची बदली करण्यात येवू नये, अशी विशेष विनंती आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये अयोजित एका पुरस्कार वितरण साहेळ्यात ते बोलत होते.


माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, तुकाराम मुंढे जिकडे जातात तिकडे तडाखा सुरू करतात, अशीच त्यांची ओळख आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांचे काम उत्तम सुरू आहे, त्यात वाईट काहीच नाहीश. त्यांनी भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या धाडसत्र कॉतुकास्पद आहे. म्हणूनच त्यांची या पदावरून बदली करण्यात येऊ नये, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं चव्हाण म्हणाले.


सध्या बाजारात मिळणार्‍या अन्नपदार्थांमधील भेसळीवर चिंता व्यक्त करताना अशोक चव्हाण यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. आजकाल आपण जे पनिर खातो, ते नक्की कसं आहे, या विचाराने खायला भीती वाटते. डॉक्टर सांगतात की प्रोटीनसाठी पनीर खा, पण ते पनीर चांगलं आहे की नाही हेच माहित नसल्यामुळे मी पनीर खाणं बंद करून टाकलं आहे. अशी मिश्किल पण गंभीर टिप्पणी त्यांनी केली.


देशात आणि राज्यात कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे की ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यामुळेच आता लोक संद्रिय अन्न आणि भाजीपाल्याकडे वळत आहेत. बाजारातील भेसळीमुळे उद्या आपल्याला कॅन्सर तर होणार नाही ना? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात जी धडक मोहिम सुरू केली आहे, ते समाजासाठी अतिशय गरजेचे आहे. या कारवाईमुळे 10 ते 20 टक्के व्यावसायिक किंवा लोक नाराज झाले तरी चालेल, पण जय यामुळे 90 टक्के समाज खुष होत असेल आणि लोकांचे आरोग्य वाचत असेल तर अशा कारवाया झाल्याच पाहिजेत, असे म्हणत त्यांनी तुकाराम मुंढेंच्या मोहिमेचे जोरदार समर्थन केले.

Comments


bottom of page