आरक्षणाचे जनक... देवेंद्र बाहुबली! सुरेश धसांच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चांना उधाण
- Navnath Yewale
- Sep 7
- 1 min read

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवस ठाण मांडून बसले होते. अखेर सरकारने जीआर काढला. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि भाजपकडून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा पुरेपुर प्रयत्न होताना दिसत आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा आरक्षणाच्यादृष्टीने महत्वाची पावले कशी उचलली गेली, याचा प्रचार भाजप समर्थकांकडून केला जात होता.
कालच राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीला वंदन करतानाचा फोटो असलेल्या जाहिती प्रसिद्ध झाल्या होत्या. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे शिल्पकार असल्याची बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर आता बीडमध्येही देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स लागल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकत आहे. ‘लढाई जिंकली बरं का... देवेंद्र बाहुबली, आरक्षणाचे शिवाजी महाराज चौकामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरील मजकूर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट्सह इतर मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले जात आहेत.



Comments