top of page

आळंदीतील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू

37 minutes ago
1 min read

रायगड: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगार समुद्रकिनारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील आळंदी परिसरातील एका खासगी कोचिंग क्लाच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून करूण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण आळंदी आणि पुणे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खासगी शिकवणी वर्गाची सहल रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या दिवेआगार येथे गेली होती. या सहलीमध्ये एकून 48 जण सहभागी झाले होते, ज्यामध्ये 25 मुले 17 मुली आणि 6 शिक्षकांचा समावेश होता.


समुद्रात मौज करण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले असताना अचानक पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे काही विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले. विद्यार्थ्यांना बुडताना पाहून किनार्‍यावर एकच धावधाव सुरू झाली आणि घबराहट पसरली.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वॉटर स्पोर्ट्स चालक आणि पोलिसांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, पाहण्याचा प्रवाह वेगवान असल्याने 8 विद्यार्थ्यांना वाचवण्यात अपयश आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आठही जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.


या दुर्घनेनंतर रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून माहिती देण्यात आली असून,

घटनेचा पुढील तपास आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून पोलीस प्रशासन पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे.

Comments


bottom of page