top of page

पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी आंदोलन इथेच होणारच! कॉकरोच जनता पार्टीचे उद्या शिवाजीपार्कवर जेल भरो; ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ...- अभिजीत दिपके

2 hours ago
2 min read

मुंबई : देशाचे मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सह निवडणुक आयुक्त विवेक जोशी आणि सुखबीर सिंग सिंधू यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचे वृत्त ‘ द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधी पक्षांनी मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरीसह गंभीर आरोप केले आहेत. या विरोधात येत्या 06 ऑक्टोबर रोजी दिल्लीत विरोधी पक्षाच्या वतिने मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी उद्या (दि.2 ऑक्टोबर) मुंबईत ‘ कॉकरोच जनता पार्टी’ कडून आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.


आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी (दि.1) कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि मुख्य निवडणुक आयुक्तांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, उद्यापासून कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होत असून,देशभरात विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर देखील हे आंदोलन होणार असून, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही दिपके यांनी दिला.

दिपके पुढे बोलताना म्हणाले, 2029 च्या निवडणुकीत ‘ जेन झी’ मतदारांची संंख्या सर्वाधिक असणार आहे. त्यांना कसा देश हवा आहे, तसा तो देणे आपली जबाबदारी आहे. लोकशाहीत जनता सरकार ठरवते. पण इथे सरकारच आपले मतदार कोण असावेत हे ठरवत आहे. मुख्य निडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार असून , पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचे पपेट आहेत असा घणाघातही दिपके यांनी केला.


2025 ची जी एसआयआर यादी आहे ती तत्काळ गोठवण्यात यावी, 2005 च्या मतदार यादीच्या आधारेच पुढील निवडणुका घेण्यात याव्यात, निवडणुक आयोगाची कार्यपद्धती ही पूर्णपणे पारदर्शक पाहिजे. अशी मागणीही यावेळी अभिजीत दिकपे यांनी केली. तसेच 2023 पासून वगळण्यात आलेल्या सुमारे 13 कोटी मतदारांच्या हक्कासाठी संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल” असा इशाराही दिपके यांनी यावेळी दिला.


आमच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळो अथवा न मिळो, आंदोलन होणारच असा निर्धार व्यक्त करत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले, ब्रिटीशांनी गांधीजींच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती, तरीही त्यांनी लढा दिला. शिवाजी पार्कवर फडणवीस रॅली काढू शकतात, मग आम्हाला तिथे आंदोलन करायला परवानगी का नाही? मला 3 दिवस नाही तर 3 महिने जेलमध्ये ठेवाा, मी बाहेर येऊन पुन्हा रस्त्यावर उतरुन संघर्ष करेन असंही अभिजीत दिपके म्हणाले.


अभिजीत दिपके यांनी यावेळी प्रमुख मागण्यां मांडत ते म्हणाले उद्यापासून मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू, मुंबईनंतर देशभरात आंदोलनाचे सत्र चालवून दिल्लीतील जंतर-मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, विरोधी पक्षांच्या 4 ऑक्टोबरच्या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचा पाठिंबा असून या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सहभागी होतील. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आणि निवडणुक अयोगाची कार्यपद्धती पूर्णपणे पारदर्शक होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशाराही अभिजीत दिपके यांनी दिला.

Comments


bottom of page