top of page

जरांगे पाटलांना मोठा धक्का; समर्थकांवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल सोशल मीडियावर धमकी, बदनामी केल्याची महिलेची तक्रार

1 hour ago
1 min read

जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे धमकी देत अश्लिल आरोप करून ते व्हायरल केल्याप्रकरणी ललिता तारक यांच्या फिर्यादीवरून जरांगे पाटील यांच्या 10 ते 11 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी ललिता तारख यांच्यावर सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिका केली जात असून एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांचा चेहरा अश्लिल चित्रांवर लावून बदनामीकारक व्हिडिओ व फोटो पसरवले जात असल्याचा आरोप ललिता तारख यांनी केला.


मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर अश्लिल टीका टिपणी होत आहे. त्यवामुळे अश्लिल टिका टिप्पणीच्या विरोधात ललिता तारख यांनी पोलिसांत धाव घेतली. ललिता तारख यांच्या फिर्यादीनुसार सोशल मीडियावर अश्लिल शिवीगाळ करण्यात आली, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी आणि धमक्या दिल्या. धमक्या देणार्‍यांवर आणि बदनामी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि 2023 पासून माझ्यासह सर्वांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी ललिता तारख यांनी केली आहे.


सतत मिळणार्‍या धमक्यांमुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे संपूर्ण कुटुंब तीव्र मानसिक त्रासाखाली असून, त्यांच्या जिवाला व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी ललिता तारख यांनी संशयित सोशल मीडिया अकाऊंड्सचे स्क्रीनशॉट आणि आलेल्या फोन कॉल्सचे पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. धमकी देणार्‍यावंर आणि एआय चा गैरवापर करून बदनामी करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी अंबड पोलिसांकडे केली आहे.

Comments


bottom of page