top of page

आहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यात एकाचा मृत्यू अत्याचाराची फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या मायलेकरा आत्मदहनाचा प्रयत्न; झटापटीत मदतीसाठी आलेला विठ्ठल खर्चन जमिनीवर कोसळला

आहिल्यानगर: सामूहिक अत्याचार झालेला असतनाही पोलिस फिर्याद दाखल करून घेत नसल्याने सोमवारी (दि. 25) दुपारी अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यासामोर एका महिलेने आपल्या मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून अत्मददहनाचा प्रयत्न केला. याचवेळी महिलेसोबत असलेल्या एका व्यक्तीचा ममिनीवर पडून मृत्यू झाला आहे. विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45 आखेगाव, ता.शेवगाव) असे मृताचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन औरंगपूर येथील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाथर्डी तालुक्यातील एका गावाती महिला आपला मुलगा विठ्ठल खर्चन याच्यासोबत सोमवारी (दि.25) दुपारी आहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यात आली. अपणावर सामूहिक अत्याचार झाला असे तिचे म्हणणे होते. मात्र पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडितेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यांच्या समवेत आलेले विठ्ठल खर्चन हे अचानक पोलिस ठाण्याच्या दारातच कोसळले. मात्र बराचवेळ त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्यानंतर त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. पोलिसांवर गंभीर आरोप करीत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर फिर्यादी महिलेने आमच्या व्यक्तीचा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह एका लोकप्रतिनिधींवर आरोप केले.


दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आक्रोश सुरू असतानाच पीडित महिला बेशुद्ध पडली.रुग्णालयातील डॉ. मनीषा खेडकर व कर्मचार्‍यांनी तातडीने उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले. या घटनेचा तपास वरिष्ठ धिकार्‍यांनी करण्याची मागणी त्यांनी केली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन औरंगपूर येथील 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोळाजणांवर गुन्हा: दरम्यान, महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दिनकर गंगाधर किलबिले, प्रभाकर सुधाकर किलबिले, कृष्णा सुधाकर किलबिले, सारंगधर उत्तम किलबिले, अमोल मश्चिंद्र कोठे, निखिल माने, जयदत्त उत्तम किलबिले, अभिषेक दिलीप किलबिले, दिलीप तुकाराम किलबिले, भीमराव ज्ञानदेव किलबिले, ईश्वर बापूसाहेब देशमुख, सुभाष गोविंद किलबिले, आनंद भाऊसाहेब कासूळे, मनीषा सुधाकर किलबिले तिचे वडील या सोळाजणांवर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने फिर्यादीमध्ये आपणांवर दोघांजणांनी अत्याचार केला व त्यांना इतरांनी मदत केली, अशी तक्रार दिली आहे. शिवाय घराच्या बांधकामासाठी ठेवलेले तीन लाख रुपये चोरी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


वंचितचा पोलिस ठाण्यावर मोर्चा: विठ्ठल खर्चन याच्या मृत्यूनंतर वंचित बहूजन आघाडीचे किसन चव्हाण यांनी पीडितेसह मयताच्या नातेवाईकांची भेट घेवून प्रकरणाची माहिती घेतली. पीडिता व तिचा मुलगा एप्रील (दि.6) गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारत होते. मात्र त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही. पोलिस निरिक्षक पुजारी व इतर पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांनी आरोपींशी संगनमत करुन पीडितेची फिर्याद घेतली नसल्याचा आरोप करत विठ्ठल खर्चन याच्या मृत्यूस पाथर्डी पोलिस जबाबदार असल्याचा घणाघातही त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आमदार मोनिका राजळे यांच्या जवळचे कार्यकर्ते असल्याचे सांगत आरोपींना पाठिशी घालणार्‍या दोषी पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वंचित बहूजन आघडीने पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मागण्या मान्य होईपर्यंत मयताच्या नातेवाईकांनी पार्थिवार अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने पाथर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


आरोपींकडून फिर्यादीवर दबाव: या प्रकरणातील पीडित महिला मागील महिनाभरापासून पोलिस ठाण्याच्या खेट्या मारत आहे. आज फिर्याद नोंदवून घेण्याच्या मागणीसाठी पीडिता व तीचा मुलगा पोलिस ठाण्यात आले असता त्यांनी अंगावर ज्वलनशीलद्रव अंगावर ओतून घेतले. यावेळी आरोपींची बाजू घेूवन पोलिसांनी फिर्यादीवरही अत्याचाराच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याचा अरोप वंचित बहूजन आघाडीचे किसन चव्हाण यांनी केला आहे.

Comments


bottom of page