इलॉन मस्कने ट्रम्प ची साथ सोडली, ‘ही‘ कंपनी बनली कारण !

अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात सल्लागार म्हणून काम करणारे इलॉन मस्क यांनी फेडरल खर्चात कपात आणि नोकरशाहीत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांनंतर राजीनामा दिला आहे. इलॉन मस्क यांनी बुधवारी संध्याकाळी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. दरदम्यान, अमेरिकन मार्केटिंग प्रोफेसर स्कॉट गॅलोवे यांनी मोठा दावा केला आहे. गॅलोवे यांच्या म्हणण्यानुसार, डीओजीईमधील निर्णयांचा परिणाम त्यांच्या ईव्ही कंपनी टेस्लावर झाला आहे. यामुळे मस्क यांना स्वत:ची कंपनी टेस्लाकडून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. मस्क यांनी नुकतेच संकेत दिले की ते आता आपली कंपनी टेस्ला आणि ‘स्पेसएक्स’च्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करतील.
गॅलोवे यांच्या म्हणण्यानुसार, जगातील सार्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांनी अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागात (डीओजीई) घेतलेल्या निर्णयांचा परिणाम त्यांच्या ईव्ही कपंनी टेस्लावर झाला. मस्क यांनी फेडरल ‘आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रँड विनाश’ मानला जात होता.
कारा स्विशर यांनी होस्ट केलेल्या फेमस पिव्हॉट पॉडकास्टच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये ग़ॅलोवे म्हणाले की, मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाचे हितसंबंध जुळवताना टेस्लाच्या ग्राहक संख्येकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी चुकीच्या लोकांना दूर केलं “ तीन चतुर्थांश रिपब्लिकन ईव्ही खरेदी करण्याचा कधीही विचार करणार नाहीत. त्यामुळे इव्हीमध्ये रस नसलेल्या लोकांमध्ये ते मिसळले. टेस्ला 2011 मधील आठव्या क्रमांकाच्या प्रतिष्ठित ब्रँडवरुन थेट 95 व्या क्रमांकावर घसरली आहे. फ्रांसमध्ये टेस्लाची विक्री 59 टक्के, स्वीडनमध्ये 81 टक्केख नेदलँडमध्ये 74 टक्के, स्वित्झर्लंडमध्ये 50 टक्के आणि पोर्तुगालमध्ये 33 टक्क्यांनी घसरल्याचे गॅलोवे यांनी अधोरेखित केलं.
मस्क यांची एक्झिट:
अमेरिकन सरकारमधील विशेष कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आला आहे. सरकारचा अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो (डिओजीई) चे ध्येय काळानुसार अधिक मजबूत होईल, असं मस्क यांनी म्हटलं. डीओजीई चे काम पाहिल्यामुळे मस्क यांना त्यांच्या व्यवसायावर लक्ष देता येत नव्हतं. मस्क हे ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल बिलावर नाराज असल्याचंही सांगितले जात होतं. यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचंही सांगण्यात येत होतं. मस्क यांनी 130 दिवस अमेरिकन सरकारमध्ये विशेष कर्मचारी म्हणून काम केले. या काळात टेस्लाला खूप मोठा फटका बसला आहे. विक्री गडगडलेली असताना शेअर्सही कोसळले आहेत.



Comments