इस्त्रायल- इराण युद्ध; इराणवरील हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक, असीम मुनीरही उपस्थित
- Navnath Yewale
- Jun 23
- 2 min read

इराणवर इस्त्रायल आणि त्यानंतर अमेरिकेचने केलेल्या हल्ल्यांमुळे शेजारील पाकिस्तानमध्ये भतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान शहबाज शरीफ असतील आणि यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरही सहभागी होणाार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ ला दिलेल्या माहितीनुसार एनससीची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. या बैठकीत लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर उपस्थित राहून समितीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीची माहिती देतील. मुनीर नुकतेच ट्रम्प यांची भेट घेऊन परतले आहेत. असीम मुनीर यांनी गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबत जेवणही केले होते. या भेटीनंतर अवघ्या चार दिवसांत अमेरिकेने इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ला केला. पाकिस्तानने इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचा हल्ला आणि इस्त्रायली आक्रमकतेचा तीव्र निषेध केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानांनी इराणची जनता आणि सरकारसोबत पाकिस्तानची अजूट एकजूटता अधोरेखित केली आणि जीवीत व वित्तहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. शरीफ यांनी चिंता व्यक्त केली की, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या संरक्षणाखाली असलेल्या अणु प्रकल्पांवर हल्ला केला. ते म्हणाले, “ हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि आयएईए कायद्याचे गंभीर उल्लंघन आहेत,”
गेल्या आठवड्यात असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या आदरातिथ्याने ते खूप प्रभावित झाले होते. यानंतर, पाकिस्तानने घोषणा केली होती की, ते भारत- पाकिस्तान युद्धविरामातील ट्रम्प यांच्या कथित प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करणार आहेत.
मात्र, या घोषणेनंतर दुसर्याच दिवशी शनिवारी ट्रम्प प्रशासनाने इराणवर हल्ला करून युद्ध अधिक वाढवले. त्यामुळे ‘ युद्ध सुरू करणार्याला नोबेल पुरस्कार कसा दिला जाऊ शकतो?” असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पाकिस्तानमध्येही सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, नागरिक सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करत आहेत.
תגובות