top of page

उच्च न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत तांत्रिक गोंधळ?, परीक्षार्थींचे ठिय्या आंदोलन; अभिजीत दिपके आंदोलनात सहभागी

छत्रपती संभाजीनगर : हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी आज (दि.16,ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर येथे आक्रमक पवित्रा घेतला.या ठिय्या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके सहभागी झाले. “ जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यऐत आंदोलनस्थळावरुन हलणार नाही, आता हेच आपलं जंतर- मंतर” असा निर्धार अभिजीत दिपके यांनी केल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.


हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेसाठी संगणकांचे किबोर्ड, माऊस निकामी झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला. दरम्यान, परीक्षा केंद्रावर लिपिक पदासाठीची परीक्षा ऑनलाईन होती. परीक्षा सुरू असताना अचानक सर्व्हर ठप्प झाले. अनेक संगणकांचे कीबोर्ड आणि माऊस योग्य काम करत नव्हते. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत सर्व यंत्रणा कोलमडली. “ जर योग्य ऑनलाईन परीक्षा घेता येत नव्हती, तर आधीच सर्व तयारी का केली नाही?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.


आंदोलनाला पाठिंबा देताना अभिजीत दिपके म्हणाले, “ तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असाल तर मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेन.” प्रशासकीय भोंगळ कारभारामुळे ही वेळ आल्याचे सांगत, “ यात विद्यार्थी नापास झाले नसून सरकार नापास झाले आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची पात्रता नसेल, तर कशाला परीक्षा घेता.? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

परिक्षा केंद्रावरील भोगळ कारभारामुळे नैराश्यात आलेल्या परीक्षार्थींचा तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. “ अता आमच्यावर जीवन संपवण्याची वेळ आली आहे.’ब अशा अत्यंत अस्वस्थ करणार्‍या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जिल्हा न्यायाधीशांनी स्वत: उपस्थित राहून फेरपरीक्षेचे लेखी अश्वासन द्यावे, अशी मागणी यावेळी दिपके यांनी केली.


लिपिक पदाची परीक्षा तात्काळ रद्द करून ती पुन्हा नव्याने घेण्यात यावी, या मागणीवर परीक्षार्थी ठाम आहेत. फेरपरीक्षेचा निर्णय होत नाही आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जात नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहील, असा इशाराहरी आंदोलनकर्त्यांसह अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

Comments


bottom of page