उदरनिर्वाहासाठी जन्मदातीने सहा लेकरांना विकलं? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना;
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 2 min read

नाशिक: उदरनिर्वाहासाठी व्यवसाय, मजुरी याही पलिकडे वेठबिगाराचाही मार्ग अवलंबल्याचे ऐकिवात, नजरेश. पण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी थेट पोटच्या सहा लेकरांना विकण्याचा जन्मदात्या आईवर प्रसंग यावा तो ही महाराष्ट्रात हे पटण्यासारखं नसलं तरी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून ही ह्रद्यद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने एक,दोन नाही तर तब्बल सहा लेकरांना पैसासाठी विकल्याचं समोर आलं आहे.
त्र्यबंकेश्वर तालुक्यातील बरड्याचीवाडी येथील बच्चुबाई अडावनेे वय 45 वर्षे यांना एकून 14 आपत्य झाली. यापैकी सहा आपत्य त्यांनी कुटुंबाच्या उनिर्वाहासाठी विक्री केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार आरोग्य विभागाच्या आशावर्कर ‘व्हिजीट’सर्वेमधून समोर आला आहे.
बच्चुबाई आडावने यांनी नजीकच्या शासकीय रुग्णालयात 10 ऑक्टोबर 2025 रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. जन्मत: बाळाचे वजन कमी असल्याने पंधरवाड्यात पून्हा बाळाचे वजन करण्यात आले असता वजनात वाढ झाल्याचे आशावर्ककर यांना दिसून आले. मात्र, किमान तीन महिने बाळाच्या सदृढ आरोग्यासाठी आशावर्कर यांची ‘व्हिजीट’ अनिवार्य असल्याने आशावर्कर अनुसया बेग या बच्चुबाई आडावने यांच्या घरी गेल्या. मात्र, बच्चुबाई आडावने व त्यांचे पती घरी नव्हते. यावर आशावर्कर यांनी तिथे असलेल्या तिच्या मुलांकडे ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या बाळा बाबत चौकशी केली असता त्यांनी सांगलेल्या प्रकाराने आशाकवर्कर अनुसया यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
बच्चुबाई आडवणे यांच्या मुलांनी सांगितले की, ‘ आमच्या आई आणि बाबांनी माझ्या लहान भावाला दहा हजार रुपयांत विकल, आम्ही म्हणत होतो विकू नका पण... ’ अशावर्कर अनुसया यांनी तातडीने महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना हि माहिती दिली. मात्र, अधिवेशन सुरू असल्याने याची वाच्यता नको म्हणून अधिकार्यांनी सुरुवातील कानावर हात ठेवले. मात्र, सामाजिक कार्यकर्ते बबनराव यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्यता उजेडात आणणली.
कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे बच्चुबाईने तीन महिन्याच्या बाळाला काही हजार रुपयात विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. प्रत्यक्षात बच्चुबाई यांना एकून 14 आपत्य ज्यामध्ये मुलं कीती आणि मुुली कीती आकडा प्राप्त नाही. यापैकी बच्चुबाई यांनी उदरनिर्वाहासाठी जवळपास सहा मुलांची काही पैशात विक्री केल्याचे धक्कादायक कारण समोर आलं आहे.
प्रत्यक्षात बच्चुबाई यांच्या कुटुंबापर्यत अद्याप शासनाची एकही योजना पोहोचली नाही. रोजगार नाही, पोट भरण्याचे कुठलंही साधन नसल्यामुळेच बच्चुबाईवर पोटच्या गोळा विकण्याची परिस्थिती येवून ठेपल्याचं सामाजिक कार्यकर्ते बबनराव यांन सांगितले. दूसरीकडे आपला देश विश्वगुरू, दारिद्र्य निर्मुलन, विकास, आर्थिक महासत्ते दिशेने वाटचाल, जीडीपी अशा विकासाच्या विविध गप्पांना या घटनेने सुरूंग तर लावलाच पण माणसांना जगण्यासाठी चक्क माणसं विकावी लागत असल्याची नामुष्की एका मातेवर येंण दुर्दैव आहे.



Comments