top of page

उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन टायगर, शिंदेसेनेत गेलेल्या 15माजी नगरसेवकांची घरवापसी!

ree

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची केवळ घोषणा बाकी असल्याने राजकीय पक्षात ‘कमबॅक’ चा सिलसिला सुरू झाला आहे. मिनी मंत्रालयावर वर्चस्व प्रस्थापिक करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगर मोहिम हाती घेतल्याचे समोर आले आहे.


मागील काळात शिवसेना (उबाठा) पक्षातून शिवसेना (शिंदे) पक्षात सामील झालेले 15 माजी नगरसेवकांची लवकरच घरवापसी होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. उद्धव बाळासाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी हा दावा केला आहे. शिंदेकडील माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.


शिवसेना फूटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, यातील अनेकजण आता शिवसेना (शिंदे) पक्षातच नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षांतर करताना मिळालेली आश्वासनं प्रत्यक्षात न उतरल्यानं अनेकजण नाराज आहेत. मुंबईतील सध्या 46 माजी नगरसेक शिवसेना (शिंदे) पक्षात आहेत.


होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या अणुषंगाने बहुतांश माजी नगरसेवकांस पदाधिकार्‍यांची शिवसेना (उबाठा) पक्षात घरवापसीचा दावा करण्यात येत आहे. आमदार सचिन आहिर म्हणाले की, काही नगरसेवक संपर्क करण्याच्या प्रयत्न करत आहेत. उद्या मनसे आणि शिवसेना (उबाठा) ची युती झाली तर मराठी भाषिकांचे मत आम्हालाच मिळणार आहे. मुंबईमध्ये नेतृत्व देण्याचे काम शिवसेना (उबाठा) पक्षाने केले आहे. आता वेगळे परिणाम होताना त्यांना पाहायला मिळत आहे. आज नेमका आकडा सांगू शकत नाही पण लवकरच नावे समोर येतील. पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही.

मुंबईचा सर्व खासदार, आमदार,विधानपरिषद सदस्य यांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाली काही गोष्टीची यामध्ये चर्चा झाली. काही गोष्टींची चर्चा करू शकत नाही महानगरपालिका निवडणुक कशी जिंकता येईल त्यात काय जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे काय परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे. तसेच भौगोलिक परिस्थिती जी बदलत चाललेली आहे त्याचा काय परिणाम आताच्या उमेदवारांवर होऊ शकतो या संदर्भातील चर्चा करण्यात आली असे सचिन आहिर म्हणाले.


निवडणुकीआधिच कोंडी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटातून अनेक नेते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे) पक्षात सामील झाले. 2017 च्या मुंबई पालिका निवडणुकीत अखंड शिवसेनेने 82 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी जवळपास 48 माजी नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकाकी निवडणुकी आधीच अंतर्गत नाराजी वाढू लागल्यानं त्यांची काहीशी कोंडी होताना दिसत आहे.

Comments


bottom of page